24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeनांदेडजि.प.कर्मचा-यांच्या बदल्यांना मुहूर्त मिळाला ; राजकीय लग्गा तर कारवाई धक्का

जि.प.कर्मचा-यांच्या बदल्यांना मुहूर्त मिळाला ; राजकीय लग्गा तर कारवाई धक्का

एकमत ऑनलाईन

नांदेड: प्रतिनिधी
जिल्हा परीषदेमधील कार्यरत गट-क, गट-ब आणि गट-क या संवर्गातील कर्मचा-यांच्या सर्वसाधारण बदल्यांना मुहूर्त मिळाला असून, दि.२० मे ते २६ मे दरम्यान जिल्हास्तरावर बदली प्रक्रीया पार पडणार आहे. गेल्या अनेक वर्षानंतर प्रथमच प्रशासकपदाच्या कार्यकाळात बदल्यांची प्रक्रिया पार पडणार आहे. जर बदल्यांसाठी राजकीय लग्गा लावण्याचा प्रयत्न केला तर संबधितावर कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासक तथा सीईओं वर्षा ठाकूर यांनी दिला आहे.

शासन निर्णय दि. १५ मे २०१४ मधील नमुद करण्यात आलेल्या कलावधीत तसेच शासन निर्णयातील तरतुदीनुसार जिल्हा परीषदेमधील गट-क, गट-ब आणि गट-क या संवर्गातील कर्मचा-यांच्या बदल्या समुपदेशनाव्दारे करण्यात येणार असून, या बदल्याचे जिल्हास्तरीय वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आवश्यक ती सर्व पुर्व तयारी करूण बदल्यांची कारवाई करण्यात यावी असे निर्देश जिल्हा परीषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दि.१३ मे रोजी परीपत्रक काढून संबंधित विभागांच्या प्रमुखांना दिले आहेत.

जिल्हास्तरीय बदल्यांचे वेळापत्रक:
पहिल्या दिवशी दि.२० मे रोजी बांधकाम विभाग सÞ१० ते १२ वा. पर्यंत, लघु पाटबंधारे विभाग दु.१२ ते १ वा. पर्यंत, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग दु . १ ते ३ वाÞ पर्यंत, महिला व बालकल्याण विभाग दु३ ते बदली प्रक्रीया संपेपर्यंत, दुस-या दिवशी दि २१ मे रोजी कृषी विभाग स१० ते १२ वा, सामान्य प्रशासन विभाग दु.१२ ते बदली प्रक्रीया संपेपर्यंत तिस-या दिवशी दि.२३ मे रोजी आरोग्य विभाग सÞ१० ते बदली प्रक्रीया संपेपर्यंत.चौथ्या दिवशी दि.२४ मे रोजी शिक्षण विभाग (प्राथ.वगळून) स.१० ते बदली प्रक्रीया संपेपर्यंत. पाचव्या दिवशी दि.२५ मे रोजी ग्रामपंचायत विभाग स.१० ते बदली प्रक्रीया संपेपर्यंत. शेवटी सहाव्या दिवशी २६ मे रोजी पशु संवर्धन विभाग स.११ ते १ वा. पर्यंत, वित्त विभाग दु.१ वा.पर्यंत या प्रमाणे बदली प्रक्रीया पार पडणार आहेÞ

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या