22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रदहीहंडी उत्सवात मराठी चित्रपटसृष्टीची उलाढाल तीन ते पाच कोटी रुपयांची

दहीहंडी उत्सवात मराठी चित्रपटसृष्टीची उलाढाल तीन ते पाच कोटी रुपयांची

एकमत ऑनलाईन

मुंबई – तब्बल दोन वर्षांनी दहीहंडी उत्सव सगळीकडे मोठ्या धुमधमाक्यात साजरा करण्यात येणार आहे. सर्वसामान्यांप्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीतही उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. अनेक कलाकार दहीहंडी उत्सवासाठी मुंबईबरोबरच ठाणे, पुणे, नाशिक, नगर आदी ठिकाणी हजेरी लावणार आहेत.

अनेक ठिकाणच्या चित्रीकरणातून कलाकारांनी सुट्टी घेतली आहे. यावर्षी दहीहंडी उत्सवात मराठी चित्रपटसृष्टीची उलाढाल तीन ते पाच कोटी रुपयांच्या आसपास असणार आहे.

दहीहंडीपाठोपाठ येणारा गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव अशा सणासुदीला दिवसांमध्ये मराठी कलाकारांना भलतीच मागणी असते. विशेष करून मालिकेतील कलाकारांची लोकप्रियता कॅश करण्याचा प्रयत्न आयोजक करीत असतात. त्याकरिता कलाकारांना लाखाच्या घरात मानधन दिले जाते. हे मानधन कलाकाराच्या लोकप्रियतेवर ठरत असते. त्यातच नाचगाणी करायची असतील तर मानधन अधिक घेतले जाते. गेली दोन वर्षे दहीहंडी उत्सव साजरा न झाल्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीचे आर्थिक नुकसान झाले होते.

मात्र यावर्षी या उत्सवाला चांगला प्रतिसाद मराठी चित्रपटसृष्टीकडून मिळत आहे. अनेक ठिकाणच्या गोविंदा उत्सवात मराठी कलाकार हजेरी लावणार आहेत. मराठी चित्रपटसृष्टीसाठी हा एक नवीन व्यवसाय गेली काही वर्षे सुरू झालेला आहे. त्यामुळे कलाकार आणि प्रेक्षक यांच्यामध्ये चांगला सुसंवाद घडत आहे. प्रेक्षकांना आपल्या लाडक्या कलाकाराला भेटण्याची यानिमित्ताने संधी मिळत आहे.

सध्या मुंबई तसेच आसपासच्या परिसरात अनेक मालिकांचे शूटिंग सुरू असते. दहीहंडी उत्सव असल्यामुळे अनेक कलाकारांनी या दिवशी सुट्टी घेतली आहे. वाहिन्यांनीदेखील आडेवेढे न घेता सुट्टी दिली आहे. एका वाहिनीच्या अधिका-याने सांगितले, की हा एक दिवस कलाकारांसाठी खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे एखाद्या कलाकाराला सुट्टी हवी असेल तर ती आम्ही देऊन टाकतो.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या