27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeऑक्सफर्डने करोनावर बनवलेली लस इन्फेक्शन रोखण्यात अपयशी

ऑक्सफर्डने करोनावर बनवलेली लस इन्फेक्शन रोखण्यात अपयशी

एकमत ऑनलाईन

न्यूयॉर्क :सध्या संपूर्ण जगात करोनाने थैमान घातला आहे. त्यात काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील मोडर्ना कंपनीने त्या दिशेने एक पाऊल टाकत करोनाविरोधात लस विकसित केल्यामुळे जगभरात एक आशा निर्माण झाली आहे. अमेरिकेत आठ स्वयंसेवकांवर करोना लसीची पहिली मानवी चाचणी करण्यात आली. त्याला बऱ्यापैकी यश मिळाले.पण आता दुसऱ्या बाजूला एक निराश करणारी बातमी सुद्धा आहे. ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने बनवलेली ‘ChAdOx1 nCoV-19’ लस माकडांवर निष्प्रभ ठरली आहे. या लसीला माकडांमध्ये इन्फेक्शन रोखता आलेले नसल्याचे एका इंग्रजी वर्तमानपत्राने म्हटले आहे.

Read More  इम्रान यांना चीनने लावला 32 अब्ज रुपयांचा चुना

ऑक्सफर्ड विद्यापीठातील जेनर इन्स्टिट्यूट ही लस विकसित करत आहे. करोनाविरोधात लस विकसित करण्यामध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ आघाडीवर आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा एक मोठा धक्का आहे. ब्रिटनकडून करोनावर व्यावसायिक लस उपलब्ध होण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो. आपल्याला अजून बरेच लांब जायचे आहे. व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला नवीन मार्ग शोधावे लागतील असे ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या आपल्या स्तंभात म्हटले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जगभरात १०० लस संशोधन प्रकल्पांवर काम सुरु आहे.

ज्या माकडांना -ChAdOx1 nCoV-19 ही लस देण्यात आली होती. त्यांचा जेव्हा Covid-19 ला कारणीभूत ठरणाऱ्या व्हायरस बरोबर सामना झाला, तेव्हा शरीरात इन्फेक्शन पसरले असे डॉ. विलियम हासीलटाइन यांच्या हवाल्याने यूकेमधील एका इंग्रजी वर्तमानपत्राने वृत्त दिले आहे. लस टोचण्यात आलेल्या आणि ज्यांना लस दिली नाही अशा माकडांमधील व्हायरल आरएनएच्या प्रमाणात फार फरक नव्हता. याचा अर्थ लस दिली त्यांनाही इन्फेक्शनची बाधा झाली असे डॉ. विलियम म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या