22.7 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeआंतरराष्ट्रीयडब्ल्यूएचओने तिस-यांदा चूक केलीत; आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारताने ठणकावले

डब्ल्यूएचओने तिस-यांदा चूक केलीत; आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारताने ठणकावले

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या चुकीवर भारताने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही चूक एकदा नव्हे तर तीन वेळेस करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने भारताच्या नकाशात बदल करत आंतरराष्ट्रीय सीमा चुकीच्या पद्धतीने दाखवल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रोस घ्रेबायसिस यांना भारताने पत्र लिहून चूक सुधारण्याची मागणी केली आहे.

भारताने अतिशय कठोर शब्दात हे पत्र लिहीले आहे. भारताचा नकाशा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आला असून त्यात तातडीने बदल करण्याची मागणी केली आहे. भारताकडून या नकाशाच्या मुद्यावर मागील एक महिन्यात तिसरयांदा हे पत्र लिहीण्यात आले आहे. याआधी डिसेंबर महिन्यात दोन वेळेस पत्र लिहीले होते. मागील आठवड्यात संयुक्त राष्ट्र संघात भारताचे कायम प्रतिनिधी इंद्रमणी पांडे यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांना याबाबतची माहिती दिली.

भारताने सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेच्या पोर्टल्सवर असलेले व्हिडिओ आणि नकाशांमध्ये भारताच्या सीमा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्या आहेत. आठ जानेवारी रोजी लिहीलेल्या पत्रात भारताने आपली नाराजी व्यक्त केली. याआधीच्या पत्रातही भारताने या सीमा योग्य पद्धतीने दाखण्याची मागणी केली होती. त्याचे स्मरणही या जानेवारीतील पत्रात करून देण्यात आले आहे.

डब्ल्यूएचओने काय चूक केली?
जागतिक आरोग्य संघटनेच्या नकाशांमध्ये जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखला भारतापासून वेगळ्या रंगात दाखवण्यात आले आहे. त्याशिवाय पाकिस्तानने चीनला १९६३ मध्ये बेकायदेशीरपणे हस्तांतरीत केलेल्या ५१६८ चौकिमी भागाच्या शक्सगाम खोर्याला चीनचा हिस्सा दाखवण्यात आला आहे. तर, चीनच्या ताब्यात असलेल्या अक्साई चीनच्या भागाला निळ्या रेषांमध्ये दाखवण्यात आला आहे. चीनचा भूभागही अशाच रंगामध्ये दाखवण्यात येतो.

मृत पालकांच्या जागी नोकरीचा विवाहित मुलीलाही समान अधिकार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,474FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या