22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeराष्ट्रीयसंपूर्ण जग भारताकडे आशेने पाहतेय

संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहतेय

एकमत ऑनलाईन

सुरत : स्टीलच्या बाबतीत भारत जगातील सर्वात मोठे केंद्र आहे. त्यामुळे जग भारताकडे आशेने पहात असल्याने धोरणात्मक वातावरण तयार करण्यावर सरकारचा भर असेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे सांगितले.

गुजरातमधील हजीरा येथे आज पंतप्रधानांच्या हस्ते आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया विस्तार प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. अंदाजे ६० हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे स्टील प्लांटच्या विस्तारानंतर जागतिक स्तरावर भारताचे स्थान वाढणार आहे.

भारताची स्टील इंडस्ट्री जगातील सर्वात मोठी व्यापार क्षेत्र असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी म्हणाले, या स्टील प्लांटच्या विस्तारामुळे गुंतवणुकीसोबत अनेक संधीची द्वारे खुली होतील. जेव्हा देशातील पोलाद उद्योग मजबूत होतो, तेव्हा देशातील पायाभूत सुविधाही मजबूत होतात. परिणामी रस्ते, रेल्वे, विमानतळ आणि बंदरांचाही विस्तार होतो. यातून रोजगाराच्या संधीही वाढीस लागतात.

भारताचे परावलंबित्व कमी होईल
पूर्वी आम्ही विमानवाहू जहाजांमध्ये वापरल्या जाणा-या पोलादासाठी परराष्ट्रांवर अवलंबून होतो. आता देशातच पोलाद उद्योग नव्या उंचीवर जात असताना भारताचे परावलंबित्व कमी होईल.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या