27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeक्रीडानव-याला संघात स्थान मिळताच पत्नीने साजरी केली हुक्का पार्टी

नव-याला संघात स्थान मिळताच पत्नीने साजरी केली हुक्का पार्टी

एकमत ऑनलाईन

लंडन : भारताकडून एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडीजचा लाजिरवाणा पराभव टी-२० मध्ये पलटवार करण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजने शुक्रवारपासून भारताविरुद्धच्या पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी १६ जणांचा संघ जाहीर केला आहे. डावखुरा फलंदाज शिमरॉन हेटमायर संघात परतला आहे. हेटमायर शेवटचा वेस्ट इंडिजकडून गेल्या वर्षी वअए मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकात खेळला होता.

हेटमायरचे टी-२० संघात पुनरागमन झाले आहे. त्याचवेळी त्याच्याशिवाय डॉमिनिक ड्रेक्स, ओबेड मॅकॉय, ओडिन स्मिथ यांना टी-२० संघात स्थान मिळाले आहे. हे सर्व खेळाडू टी-२० स्पेशालिस्ट मानले जातात. शिमरॉन हेटमायर संघात स्थान मिळाले म्हणून पत्नीने हुक्का पार्टी केली. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी-२० सामना ब्रायन लारा स्टेडियमवर होणार आहे. १ आणि २ ऑगस्ट रोजी वॉर्नर पार्कवर दुसरा आणि तिसरा टी-२० सामना होणार आहे. चौथा आणि पाचवा टी-२० ६ आणि ७ ऑगस्ट रोजी फ्लोरिडा, यूएसए येथे होणार आहे. हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजल्यापासून खेळवले जातील. भारताने यजमान वेस्ट इंडिजचा एकदिवसीय मालिकेत ३-० असा क्लीन स्वीप केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या