37.8 C
Latur
Monday, May 29, 2023
Homeहॉर्न वाजवण्यास मनाई केल्याने तरुणावर कोयत्याने वार

हॉर्न वाजवण्यास मनाई केल्याने तरुणावर कोयत्याने वार

एकमत ऑनलाईन

किरकोळ कारणावरून उचलले टोकाचे पाऊल; तरुण गंभीररीत्या जखमी

मुंबई – गाडीचा हॉर्न वाजवण्यास मनाई केल्याने चेंबूरच्या सिंधी कॅम्प येथे तिघा जणांनी एका तरुणावर कोयत्याने वार केला. या हल्ल्यात विकास शेजुळ (२०) हा तरुण गंभीर रित्या जखमी झाला आहे.

चेंबूरच्या सिंधी कॅम्प येथील इंदिरा नगर येथे रात्री साडेनऊच्या सुमारास विकास त्याच्या मित्रांसोबत फिरत होता. यावेळी तेथे एमएच ०२ सी आर ४४५१ या चारचाकी गाडीतील तरुण गाडीचा सतत हॉर्न वाजवत होते. यावेळी विकास ने त्यांना हॉर्न वाजवण्यास मनाई केली. याचाच राग मनात ठेवून गाडीतील तीन तरुणांनी ठार मारण्याच्या उद्देशाने विकासच्या डाव्या खांद्यावर कोयत्याने वार केला. याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी त्यात तीन आरोपींवर गुन्हा दाखल केला असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Read More  ड्रग्जसोबत आढळला क्रिकेटपटू !

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या