उदयनारायपूर : स्वत:पेक्षा अर्ध्या वयाच्या तरुणीसोबत लग्न करायच्या इच्छेने 30 वर्षीय तरुणाने हैवानी पाऊल उचलले. पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यातील उदयनारायपूर येथे राहणाऱ्या या तरुणाने त्याचे एकतर्फी प्रेम असलेल्या तरुणीचे मुंडके छाटले. त्यानंतरल त्याने स्वत: देखील गळफास घेत आत्महत्या केली आहे.
अजित बाग असे त्या 30 वर्षीय तरुणाचे नाव असून त्याचे त्याच्याच गावात राहणाऱ्या 18 वर्षीय मुलीवर प्रेम होते. त्याने तिला लग्नाची मागणी देखील घातली होती. मात्र तरुणीने लग्नाला नकार दिला होता. त्यामुळे संतापलेल्या तरुणाने मुलीच्या घरासमोरच तिला गाठून तिचे मुंडके उडवले. त्यानंतर तो तिथून फरार झाला. पोलिसांनी त्याची शोधाशोध केली असता त्याचा मृतदेह उदयनारायपूर पासून 6 किमी अंतरावर असलेल्या जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला.
काही दिवसांपूर्वी दिल्लीत एका तरुणाने एकतर्फी प्रेम असलेल्या विवाहीत महिलेला लॉकडाऊनच्या काळात बघायला मिळत नसल्याने तिच्याच घरासमोर आत्महत्या केल्याचे समोर आले होते. विकी असे त्या तरुणाचे नाव होते. सदर महिलेने तरुणाला लग्नासाठी नकार दिला होता तसेच ती त्याचे फोन देखील उचलत नव्हती. त्यामुळे तो संतापला होता.
Read More रेल्वे पुन्हा देतंय नोकरीची संधी, नाही द्यावी लागणार लेखी परिक्षा, जाणून घ्या