22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्र.... तर आमदारकीचे राजीनामे द्या

…. तर आमदारकीचे राजीनामे द्या

एकमत ऑनलाईन

मुंबई : तुम्ही एका बापाचे असाल तर आमदारकीचे राजीनामे द्या, अशा बोच-या शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोरांना आव्हान दिले आहे. हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, त्यांच्या हातात भगवा झेंडा आहे. वेळ पडल्यास शिवसैनिक झेंडा खिशात ठेवतील आणि त्याचा दांडा वापरतील असा सज्जड इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे.

आमदारांच्या बंडखोरीनंतर आता शिवसेनेने स्थानिक पातळीवर शिवसैनिकांचे मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. दहिसर येथील शिवसेनेच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना त्यांनी शिवसेना बंडखोरांना इशारा दिला. शिवसेनेला बंड नवीन नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेने असे अनेक बंड पचवले असल्याचे सांगितले.

संजय राऊत यांनी बंडखोर आमदार गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. गुलाबराव पाटील हे पानटपरी चालवत होते. संदीपान भुमरे हे साखर कारखान्यावर सुरक्षा रक्षक होते. त्यांना शिवसेनेने आमदार केले, कॅबिनेट मंत्री केले असल्याचे सांगितले. आज त्यांनी शिवसेनेशी प्रतारणा केली असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. हे शिवसेनेवर संकट नाही तर ही संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

गुवाहाटीमध्ये एक मंदिर आहे. त्या ठिकाणी रेड्यांचे बळी देतात. आम्ही ४० रेडे पाठवले असल्याचे उपरोधिकपणे राऊत यांनी म्हटले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या