25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्र...तर विरोधी पक्षात बसू

…तर विरोधी पक्षात बसू

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्यापूर्वीच आपलं शासकीय निवासस्थान असलेला ‘वर्षा’ बंगला सोडला. या सर्व घडामोडीत शरद पवार कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे राहू अशी भूमिका शरद पवारांची असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यातील घडामोडींसंदर्भात जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकी दरम्यान नेमकी काय चर्चा झाली याबद्दल माहिती दिली आहे.

शरद पवार यांच्या निवासस्थानी आमची बैठक झाली. गेल्या ३-४ दिवसांतील घटनांचे मूल्यमापन करण्यात आले. सरकार टिकून राहण्यासाठी जे काही करणे आवश्यक आहे ते आपण करू. या सरकारसोबत आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहू असे शरद पवार यांनी म्हटले आहे असे सांगत जयंत पाटलांनी राष्ट्रवादीचा उध्दव ठाकरेंना पांिठबा असल्याचे स्पष्ट केलं.

आज संध्याकाळी ५ वाजता मी आमच्या सर्व आमदारांना चालू घडामोडींची माहिती देण्यासाठी बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. आमचे खासदार, संघटना प्रमुख असतील अशी माहिती त्यांनी दिली आहे.
तसेच मविआ सरकार बरखास्त होण्यावरही त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. सरकार राहिलं तर आम्ही सत्तेत राहू, सरकार गेल्यास विरोधी पक्षात बसू. अशी प्रतिक्रिया सद्यस्थितीवर जयंत पाटलांनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या