30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeनव्याने सुरुवात करताना अनेक आव्हानांना सामोरे जावं लागेल-मुख्यमंत्री

नव्याने सुरुवात करताना अनेक आव्हानांना सामोरे जावं लागेल-मुख्यमंत्री

एकमत ऑनलाईन

सरकारला-जनतेला एकमेकांच्या हातात हात घालून चालायचं आहे
हळू हळू सगळं सुरू करू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ‘पुन:श्च हरी ओम’चा नारा!

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊन आणखी वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये पाचव्यांदा वाढ करण्यात आली आहे. लॉकडाऊन 5 हा 1 जून ते 30 जूनपर्यंत असणार आहे. केंद्र सरकारने काल (30 मे) लॉकडाऊन 5 बाबत नियमावली जाहीर केली. त्यानंतर आज राज्य सरकारनेही लॉकडाऊन 5 साठी नवी नियमावली जाहीर केली. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधत आहेत

यावेळी मुख्यमंत्री महाराष्ट्राला अनलॉक कसं करणार याबाबत माहिती देण्याची शक्यता आहे. तसेच, Maharashtra Mission Begin Again या संकल्पनेबाबतही मुख्यमंत्री जनतेला सांगितल. गेल्या अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन असलेल्या महाराष्ट्रात पुन्हा एका नव्याने सुरुवात करताना अनेक आव्हानांना सामोरे जावं लागेल. त्यामुळे मुख्यमंत्री आज काय बोलतील याकडे सध्या सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.

केंद्र सरकारनंतर महाराष्ट्रातल्या ठाकरे सरकारनेही देखील आपली नियमावली जाहीर केली आहे. राज्य सरकारने देखील 30 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र काही बाबींमध्ये सरकारने शिथीलता आणली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याला संबोधित करत आहेत.

Read More  चीनमधून कंपन्या भारतात येण्याचा मार्ग मोकळा

इतर देशांचा अनुभव पाहून निर्णय घेतोय
‘मिशन बिगीन अगेन म्हणजे पुनश्च हरीओम’ असा नारा देत लॉकडाऊन हे विज्ञान असेल, तर ते उघडणं ही कला आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. हळूहळू आपण आता आपल्या आयुष्याला नव्याने सुरूवात करतोय. इथून पुढच्या काळामध्ये शासन आणि जनतेने हातात हात घालून चाललं पाहिजे. इतर देशांचा अनुभव पाहून निर्णय घेतोय. हळूहळू लॉकडाऊन शिथिल करतोय. 3 जूनपासून हातपाय हलवायला सुरूवात करू, असं ते म्हणाले.

पावसाळा तोंडावर असल्याने काळजी घ्यावी लागेल
पावसाळा तोंडावर असल्याने काळजी घ्यावी लागेल. पावसाळ्याची सुरुवात म्हटल्यावर मी सर्वांची बैठक घेतली, त्यात समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज आहे, मात्र अचानक पूरपरिस्थिती निर्माण झाली तरीही आपण सज्ज आहोत, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. येत्या दोन दिवसात पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. आपली यंत्रणा सज्ज आहे. पुढील चार दिवस मच्छीमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये, असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं, 5 तारखेपासून काही दुकानं सुरु करणार, तर 8 तारखेपासून कार्यालये सुरु करण्याचा निर्णय, मात्र कर्मचाऱ्यांची संख्या 10% असेल. महाराष्ट्र किती शिस्तबद्ध आहे, याचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे, असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

 1. रेल्वेच्या माध्यमातून १६ लाख मजुरांना त्यांच्या राज्यात सोडलं
  एसटीच्या माध्यमातून सव्वा पाच लाख लाख मजुरांना सीमेवर सोडलं
 2. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वे उपलब्ध करुन दिल्याने मदत झाली त्यामुळे त्यांचे खूप धन्यवाद
 3. संसर्ग रोखणे आणि मृत्यू दर रोखणे आमचं उद्दीष्ट
 4. राज्याने रुग्णांवर उपचार आणि सुविधांकडे पूर्ण लक्ष दिलं आहे
 5. रुग्ण शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात येणं धोकादायक आहे
 6. दुखणं अगावर काढू नका, ही विनंती आहे
 7. कोणतीही आपत्ती आली तर आपण सज्ज आहोत
 8. आयसीयू बेड्स वाढवण्यावर आमचा भर आहे
 9. बेड वाढवण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न
 10. रुग्णांना बेड मिळत नाही यामध्ये काही प्रमाणात तथ्य
 11. लॅब आणि चाचण्यांसाठी केंद्र वाढवण्याला आमची प्राथमिकता
 12. अवघ्या दोन चाचणी केंद्रांवरुन १०० चाचणी केंद्र अशी प्रगती झाली आहे
 13. महाराष्ट्रात सध्या ७७ चाचणी केंद्र आहेत
 14. कोरोनाचं संकट किती मोठं आहे याचा अंदाज कोणालाच नव्हता
 15. वृत्तपत्र वितरक करणाऱ्या मुलांची काळजी घेणे अनिवार्य
 16. पुढील रविवारपासून घरपोच वृत्त वितरण सुरू होणार
 17. राज्याला बदनाम करण्याचं कारस्थान पाहून दु:ख होतं
 18. राज्यात व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांची संख्या फक्त २००
 19. राज्यात तब्बल २८ हजार कोरोना बाधित रुग्ण बरे झाले
 20. लक्षणे आढळली तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधाच
 21. घरातून बाहेर पडणाऱ्यांनी घरात येताना सर्वाधिक काळजी घ्या, आपल्या कुटुंबियांना संसर्ग होणार नाही याची काळजी घ्या
 22. ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांना विकार आहेत त्यांनी घराबाहेर पडू नये
  ज्यांना आवश्यकता नाही त्यांनी कृपया घराबाहेर पडू नये
 23. मित्रमंडळी भेटली तर सुरक्षित अंतर ठेवा
 24. आऊटडोर व्यायामाला ३ जूनपासून परवानगी दिली आहे
 25. हळूहळू नियम शिथिल करत आहोत, पण गर्दी होणार नाही याची पूर्ण काळजी घ्या
 26. ८ जूनपासून शासकीय आणि खाजगी कार्यालये मर्यादित कर्मचाऱ्यांसह सुरू
 27. ५ जूनपासून दुकाने सुरू करण्याची परवानगी, ही दुकाने सम-विषम पद्धतीने उघडण्यात येणार
 28. पुढचे काही दिवस नियम काटेकोराने पाळा
 29. ज्यांनी लॉकडाऊन उठवला त्यांची अवस्था आपल्या समोर आहे
 30. हात वारंवार धुवत रहा, तोंडाला हात लावणं टाळा
 31. तोंडावर मास्क लावणे हे अत्यंत गरजेचे आहे
 32. मच्छिमार बांधवांनी पुढील चार दिवस समुद्रात जाऊ नये
 33. येत्या काही तासात किनारपट्टीवर वादळ, पश्चिम किनारपट्टीवरील नागरिकांनी सज्ज राहावे
 34. पावसाळ्याची आता सुरूवात होणार आहे त्यामुळे अजून खबरदारी घ्यावी लागणार
 35. यंदा पाऊस चांगला होणार
 36. मिशन बिगीन अनेग ही मोहीम राबवायची
  लॉकडाऊन हा शब्द आता कचऱ्याच्या पेटीत टाका

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

 • बाहेर फिरताना जितके अंतर ठेऊ, तितकेच कोरोनापासून अंतर ठेवा, मित्र-आप्तेष्ट यांना भेटा, पण अंतर राखून नमस्कार करा, तीन तारखेपासून घराबाहेर व्यायाम करण्यास मुभा
 • ज्या ठिकाणी गर्दी होईल त्याला परवानगी नाही. एकमेकांपासून अंतर ठेवू तेवढंच कोरोनापासून अंतर राहिल, नातेवाईक भेटले तरी नमस्कार करा :
 • इतर देशांप्रमाणे आपल्याला उघडझाप करायची नाही, आपण एकदा उघडलेली गोष्ट बंद करायची नाही :
 • आपण उघडछाप करायची नाही, एखादी गोष्ट सुरुवात करु ती बंद करायची नाही
 • मास्क अनिर्वाय आहे, हात धुणं महत्वाचं, कंटाळा करु नका, चेहऱ्याला हात लावू नका
 • येत्या दोन दिवसात पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता, आपली यंत्रणा सज्ज, पुढील चार दिवस मच्छीमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये
 • पावसाळ्याची सुरुवात म्हटल्यावर मी सर्वांची बैठक घेतली, त्यात समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज आहे, मात्र अचानक पूरपरिस्थिती निर्माण झाली तरीही आपण सज्ज आहोत
 • मिशन बिगीन अगेन म्हणजे पुनश्च हरीओम, लॉकडाऊन हे विज्ञान असेल, तर ते उघडणं ही कला आहे, पावसाळा तोंडावर असल्याने काळजी घ्यावी लागेल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या