24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeआंतरराष्ट्रीयश्रीलंकेत अन्नपदार्थांचाही तुटवडा

श्रीलंकेत अन्नपदार्थांचाही तुटवडा

एकमत ऑनलाईन

कोलंबो : श्रीलंकेतील आर्थिक आणि अन्न संकटामुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. लोकांना एलपीजी गॅस आणि जीवनावश्यक खाद्यपदार्थ मिळत नसल्याची स्थिती आहे. याच दरम्यान, पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी दिलेल्या माहितीनुसार, देश सध्या अत्यंत वाईट परिस्थितीतून जात आहे आणि अन्न संकटाचा सामना करण्यासाठी सरकार पुढील प्लांटिंग सेशनसाठी पुरेसे खत खरेदी करेल.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी केमिकल आणि खत उत्पादनांच्या आयातीवर बंदी घातली होती. त्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान होऊन अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला. सरकारला इतर देशांतून खाण्यापिण्याच्या वस्तुंची आयात करावी लागली आणि त्यामुळे महागाई वाढली. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी ट्विट केले की, मे आणि ऑगस्टच्या सीझनसाठी खत मिळू शकत नाही परंतु सप्टेंबर आणि मार्च सीझनसाठी खताची व्यवस्था करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत. पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी लोकांना परिस्थितीचे गांभीर्य समजून घेण्याचे आणि स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, कोलंबोमध्ये फळे विकणा-या एका महिलेने सांगितले की, दोन महिन्यांत देशातील परिस्थिती कशी झाली हे माहीत नाही.

अत्यावश्यक औषधांचा तुटवडा
देशात एका सिलिंडरची किंमत ५००० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तर एप्रिलमध्ये हा भाव २६७५ रुपये होता. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर केवळ २०० सिलिंडरची डिलिव्हरी झाली. गॅस आणि अन्नाशिवाय आपण कसे जगू? शेवटी आपल्यापुढे एकच पर्याय असेल की आपण उपाशी मरू. श्रीलंकेत सध्या परकीय चलन, तेल, खाद्यपदार्थ आणि अत्यावश्यक औषधांचा प्रचंड तुटवडा आहे, त्यामुळे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे.

पाकची अर्थव्यवस्था कोसळली?
चीनच्या नादी लागलेले एकेक शेजारी धराशायी पडू लागले आहेत. श्रीलंकेनंतर गेल्या ब-याच काळापासून तग धरलेल्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था आता कोसळण्याच्या उंबरठ्यावर आहे. यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने महागड्या, चैनीच्या वस्तूंच्या आयातीवर बंदी आणली आहे. यामध्ये मोबाईल, कार, घरगुती उपकरणे, शस्त्रास्त्रे आदी अत्यावश्यक नसलेल्या वस्तू आहेत. आपत्कालीन आर्थिक योजनेनुसार ही बंदी लादण्यात आली आहे. शरीफ यांनी ट्विट करून याची माहिती दिली. यामुळे पाकिस्तानकडील परदेशी चलनाची बचत होईल, असा दावा त्यांनी केला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या