19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeराष्ट्रीयसपा सोबत युती नाहीच

सपा सोबत युती नाहीच

एकमत ऑनलाईन

लखनौ : उत्तरप्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून सध्या सर्वच पक्षाने प्रचाराला आपआपल्या पातळीवर सुरुवात केली आहे. उत्तरप्रदेशमधील येत्या विधानसभा निवडणुकांत समाजवादी पार्टीसोबत युती करणार नसल्याचे आझाद समाज पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी शनिवारी स्पष्ट केले. अखिलेश यादव यांनी आमचा अपमान केल्याचा दावा करत विधानसभेसाठी समाजवादी पार्टीसोबत जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, आम्ही एका महिन्यापेक्षा जास्त दिवस यावर चर्चा करत होतो आणि मागच्या सहा महिन्यापासून भेटी झाल्या पण युतीसंदर्भात काहीही साध्य झाले नाही. म्हणून आम्ही आगामी विधानसभा स्वबळावर लढणार आहोत. पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही विकासाच्या मुद्यावर आणि दलित आणि मागासवर्गीयांच्या ठोस आरक्षण योजनेवर ठाम असून त्यासाठी समाजवादी पार्टी सहमत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला. तसेच दलित, मागासवर्गीय आणि दुर्लक्षित असलेला समाज अखिलेशला पाठिंबा देत आहे कारण त्यांना वाटते की अखिलेश आपल्याला सामाजिक न्याय देईल, पण मला वाटते की, अखिलेशला सामाजिक न्यायाचा अर्थच अजून समजलेला नाही, असे चंद्रशेखर म्हणाले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या