26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्रईडीच्या कायद्यात लवकर जामीन मिळत नाही

ईडीच्या कायद्यात लवकर जामीन मिळत नाही

एकमत ऑनलाईन

नाशिक : खासदार संजय राऊत यांच्या ईडी कारवाईवर माजी मंत्री छगन भुजबळ आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. छगन भुजबळ म्हणाले कि, इडीच्या कायद्याच्या लवकर जामीन मिळत नाही.. पण काही मार्ग निघाला तर आमच्या शुभेच्छाच, असल्याचा सल्ला वजा चिमटा त्यांनी यावेळी खासदार संजय राऊतांना काढला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांना कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे राऊत यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. या पार्श्वभूमीवर आज नाशिक भुजबळांनी माध्यमाशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रभाग रचनेच्या निर्णयावर भुजबळ म्हणाले कि, एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडीतच होते, पण आता प्रभाग रचना का बदलली सांगता येणार नाही. प्रभागात इच्छुक उमेदवार असतात, त्यासाठी निवडणुकीत ते तयारी करत असल्याने वार्ड बदलला कि, त्रास होतोच. तर राज्यपालांच्या भेटीवर ते म्हणाले, राज्यपालांकडे आम्ही मागणी केली की पूरग्रस्तांना, शेतक-यांना मदत करा.

९२ नगरपालिका, ४ नगरपंचायत मध्ये ओबीसी आरक्षण लागू नाही.. बांठीया कमिशननमध्ये ओबीसीची संख्या कमी दाखवली जात आहे, तसेच अहवालात अनेक त्रुटी आहेत, त्यासाठी तुम्ही लक्ष घालावे, अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केल्याचे भुजबळांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या