23.2 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeआंतरराष्ट्रीयलक्षणे नसलेल्याकडून कोरोनाचा संसर्ग नाही

लक्षणे नसलेल्याकडून कोरोनाचा संसर्ग नाही

एकमत ऑनलाईन

जिनिव्हा : सार्स-कोव्ह 2 विषाणूंची बाधा झालेले, मात्र लक्षणे नसलेल्याकडून  संसर्गाची शक्‍यता नसते, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी रात्री उशीरा जाहीर केले. मात्र याबाबत अत्ताच काही भाकीत करणे हे खूप घाईचे ठरेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकृत साथरोगतज्ज्ञ मारिया वॅन केरकोव्हे यांनी येथे प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. नव्या करोनाबाधितांच्या संख्येचा उच्चांक दररोज नव्याने होत आहे. या साथीला आटोक्‍यात आणण्यासाठी सर्व देश प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत, असे त्या म्हणाल्या.

आमच्याकडे सध्या उपलब्ध असलेल्या तपशीलावरून लक्षणे नसलेल्या बाधिताकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होण्याची घटना क्वचितच घडली आहे. हे फारच दुर्मिळ आहे, असे व्हॅन म्हणाल्या. संयुक्त राष्ट्रेच्या मुख्यालयात त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

Read More  आता केबल TV द्वारे मिळणार इंटरनेट, सरकारमार्फत मार्गदर्शक तत्वे जारी

ज्ञात रुग्णाच्या संपर्कावरून लक्षणे नसलेले बाधित ओळखता येतात. याबाबत मोजक्‍या देशांनी आकडेवारीचा तपशील जाहीर केला आहे, त्यावरून हे अनुमान बांधण्यात येते. यातील काही तपशील अद्याप प्रकाशित झालेला नाही. हा तपशील सखोल अभ्यास करून त्याची खातरजमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे त्या म्हणाल्या.व्हॅन म्हणाल्या, सिंगापूरमधून हाती आलेल्या तपशीलावरून हे अनुमान काढले जात आहे.

चीनने त्यांच्या वुहान प्रांतात सुमार 99 लाख रहिवाशांमध्ये 300 लक्षणे नसलेले बाधित असल्याचे सांगितले होते. या बाधितांच्या टूथब्रश, मग, टॉवेल, मास्क यांच्यात विषाणूंचे प्रमाण शुन्य असल्याचे आढळले आहे. या 300 बाधितांच्या निकटच्या संपर्कात आलेल्या एक हजार 174 लोकांची करोना चाचणी निगेटिव्ह आल्याचे वृत्त झिनुहा या चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिले आहे.

तज्ज्ञांनी मात्र लक्षणे नसलेल्या व्यक्ती आणि आधी लक्षणे नसलेल्या मात्र नंतर लक्षणे दिसून आलेल्या व्यक्ती यांच्यात फरक करून त्याबाबतचा तपशील मांडण्याची मागणी जागतिक आरोग्य संघटनेकडे केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या