22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeचीन, ईस्ट इंडिया कंपनीत साम्य नाही

चीन, ईस्ट इंडिया कंपनीत साम्य नाही

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : चीन हा पाकिस्तानचा सर्वांत जवळचा मित्र आहे. चीन आणि ब्रिटीश राजवटीतील ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात साम्य नाही. राजनैतिक आणि आर्थिक पातळीवर चीनने पाकिस्तानला नेहमीच पाठिंबा दिला आहे.

पाकिस्तान आणि विशेषत: बलुचिस्तानच्या विकासात चीनने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अशा परिस्थितीत बलुचिस्तानमधील जनतेने चिनी गुंतवणूकदारांना महत्त्व देण्याचे आवाहन पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केले.

ग्वादर हे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करणा-या लढवय्यांचे केंद्र राहिले आहे. काही वर्षांत या भागात चिनी कारवायांमध्ये वाढ झाल्यामुळे दहशतवादी गटांकडून चीनशी संबंधित प्रकल्प आणि चिनी कर्मचा-यांना लक्ष््य करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या