21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंसारखा सात्विक माणूस नाही

उद्धव ठाकरेंसारखा सात्विक माणूस नाही

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर टीका करत शिवसेनेतील ४० आमदारांचा गट फुटून स्वतंत्र झाला आणि त्यांनी शिंदेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. या सर्व आमदारांकडून उद्धव ठाकरेंबाबत, त्यांच्या आसपासच्या नेतेमंडळी आणि उच्चपदस्थांबाबत आरोप आणि दावे केले जात आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊतांना देखील लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकारला पाठिंबा देणारे आणि आता शिंदे गटात सहभागी असलेले आमदार बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरेंचे कौतुक केले आहे. तसेच, नव्या सरकारमध्ये असलेल्या मंत्रिपदाच्या अपेक्षेविषयीही बच्चू कडूंनी भूमिका स्पष्ट केली आहे.

यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी आपण सुरतला शिंदे गटात सहभागी होण्यासाठी नसून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात समेट होऊ शकेल का? हे पाहण्यासाठी गेलो होतो, असा खुलासा केला आहे. ‘‘मुंबईहून सुरतला जाण्याआधी मी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला होता.

पण त्यांचा फारसा समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. मग मला वाटलं की शिंदे आणि ठाकरेंमध्ये समन्वय साधता येईल का? त्यासाठी आम्ही सुरतला गेलो. पण तोपर्यंत तिथे आमदारांची संख्या २९-३० पर्यंत गेली होती. तेव्हा लक्षात आलं की तिथे कुणाची समेटाची मानसिकता नव्हती. सत्तास्थापनेनंतरच तिथून निघण्याची प्रत्येकाची भूमिका होती’’, असे बच्चू कडू म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या