36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeराष्ट्रीयशेतक-यांना डांबण्यासाठी स्टेडियम नाही

शेतक-यांना डांबण्यासाठी स्टेडियम नाही

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत येणा-या लाखो शेतकरी निदर्शकांना डांबण्यासाठी शहरातील नऊ स्टेडियमचे रुपांतर कारागृहात करण्याची दिल्ली पोलिसांची विनंती दिल्ली सरकारने फेटाळून लावली. शेतक-यांची ही निदर्शने समर्थनीय असल्याचे आप सरकारने म्हटले आहे.

शेतक-यांच्या मागण्या रास्त आहेत. केंद्राने तातडीने त्या स्वीकारून शेतक-यांना सामोरे जावे. शेतक-यांची निदर्शने शांततेने सुरू आहेत, असे पोलिसांना पाठवलेल्या पत्रात दिल्लीचे गृहमंत्री सत्येंद्र जैन यांनी स्पष्ट केले आहे.

शांततापूर्ण निदर्शने करणे हा प्रत्येक भारतीयाचा हक्क आहे. त्यामुळे या कारणासाठी त्यांना कारागृहात टाकता येणार नाही. त्यामुळे स्टेडियमचे कारागृहात रुपांतर करण्याची विनंती दिल्ली सरकार फेटाळून लावत आहे, असे दिल्ली गृहमंत्रालयाच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

वीजबिलात सवलतची घोषणा करताना घाई, चूक झाली – अशोक चव्हाण यांची प्रांजळ कबुली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या