28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यात कुपोषणामुळे एकही मृत्यू नाही

राज्यात कुपोषणामुळे एकही मृत्यू नाही

एकमत ऑनलाईन

गावित यांची माहिती; अजित पवार भडकले!
मुंबई : राज्यात कुपोषणामुळे एकही बालमृत्यू झालेला नाही, असे विधान आज अधिवेशनात आदिवासी मंत्री विजयकुमार गावित यांनी केले आहे. याच मुद्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना कोंडीत पकडले आहे.

आज पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. या दिवशी राज्याचे आदिवासी विकास मंत्री यांना विरोधकांनी कुपोषणामुळे झालेल्या बालमृत्यूंची आकडेवारी सादर करण्यास सांगितले. गेल्या पाच वर्षांच्या काळात १६ आदिवासी जिल्ह्यांत कुपोषणामुळे ८ हजार ८४२ मृत्यू झाले का?

याबद्दल विचारणा झाली. त्यावर गावित यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात कुपोषणामुळे बालमृत्यू झालेला नाही. आरोग्य तसेच महिला बाल कल्याण विभागाने ही माहिती दिल्याचे गावित यांनी सांगितले.

या उत्तराला दिलीप वळसे पाटील आणि अजित पवार यांनी आव्हान देत आक्षेप घेतला. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही गावित यांच्या उत्तराची दखल घेतली. कुपोषण आणि बालमृत्यूबाबत पुन्हा माहिती घ्या आणि उद्या याचे उत्तर द्या, असे निर्देश देत हा प्रश्न राखून ठेवला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या