19 C
Latur
Wednesday, November 30, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबईत डोळे येण्याची साथ पसरली

मुंबईत डोळे येण्याची साथ पसरली

एकमत ऑनलाईन

मुंबई : आधी कोरोनाचा कहर, मग डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचा सामना केलेल्या मुंबईकरांसाठी आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईमध्ये सध्या आणखी एका संसर्गाचा धोका वाढला आहे. मुंबईत डोळे येण्याची साथ पसरत आहे. शहरात अनेक भागातल्या नागरिकांना सध्या याचा सामना करावा लागत आहे. वातावरणातील बदलामुळे मुंबईकरांना आधीच विषाणूजन्य आजारांनी ग्रासले आहे. अशातच आता आणखी एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे.

पाणीदार डोळे तसंच डोळे लाल होणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत. या प्रकारची काही लक्षणे सध्या मुंबईकरांमध्ये दिसत आहेत. अशा परिस्थितीत योग्य ती खबरदारी घेत संसर्ग टाळण्याचा आणि संसर्ग झाल्यास त्यावर कोणताही घरगुती उपाय न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

डोळे येण्याचा संसर्ग सामान्यत: आधी एकाच डोळ्याला होतो. मात्र एक डोळा आल्यानंतर दुस-या डोळ्यालाही याचा संसर्ग होतो. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यापासून ही साथ मुंबईत झपाट्याने पसरत आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने रुग्णांनी बाहेर जाणे टाळावे, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला आहे.

डोळ्यांमध्ये सतत काहीतरी गेल्यासारखे वाटते. यासोबतच डोळ्यांतून सतत पाणी येते. डोळे लाल दिसतात आणि डोळ्याच्या आतल्या कोप-यांना आणि पापण्यांच्या आतल्या भागांना सूज येते. डोळे चिकट होतात, सोबतच डोळ्यांच्या आतमध्ये खाज येणे, ही तक्रारही जाणवते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या