21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeमहाराष्ट्रनाल्यातले पैसे खाल्ले, कच-यातले खाल्ले, मुंबईला तुंबवले

नाल्यातले पैसे खाल्ले, कच-यातले खाल्ले, मुंबईला तुंबवले

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईमध्ये सकाळपासून पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचल्याचे चित्र आहे. मुंबई तुंबण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान भाजपाने शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. नाल्यातले पैसे खाल्ले, कच-यातले खाल्ले, मुंबईला तुंबवून दाखवले असे म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातच पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने सर्वच नागरिकांना आपल्या कामासाठी घरातून बाहेर निघताना पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडा, असा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक ५-१० मिनिटे उशिराने सुरू आहे तर पश्चिम रेल्वे मार्गावरील ट्रेन्स १० मिनिटांच्या विलंबाने धावत आहेत.

भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केल्े आहे. नाल्यातले पैसे खाल्ले, कच-यातले खाल्ले, मुंबईला तुंबवून दाखवले… आता शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेतून देखील तोंड काळे करण्याची तयारी ठेवावी…असे भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

नवे शिवसेना-भाजप सरकार जनतेच्या सेवेत रुजू झाले. टोमणे, फेसबुक लाईव्ह, तोंडाच्या वाफा हा सगळा महाराष्ट्राचा अडीच वर्षांचा दुर्दैवी भूतकाळ होता. आता हे आपले सरकार गोरगरीब, दुबळ्या जनतेचे सरकार आहे असे म्हटले आहे.

रायगड, रत्नागिरीमध्ये एनडीआरएफच्या टीम तैनात
मुंबईसह उपनगरांमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. एनडीआरएफच्या टीम रत्नागिरी, रायगडमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने याबाबत अंदाज वर्तवला आहे.

परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद
सध्या रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी- नाले दुथडी भरून वाहत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे या घाटातील दरड कोसळली आहे

पुण्यात पावसाची रिमझिम
शहरात आजपासून पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी (४ जून) शहरातील अनेक परिसरात पावसाने हजेरी लावली. पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्याने शहरात ढगाळ वातावरण आहे. पुणेकर पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मुंबई- आणि कोकण भागात पावसाची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे पुण्यातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या