24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeडोक्यात टरबूज घालून गेले दुकान लुटायला.....

डोक्यात टरबूज घालून गेले दुकान लुटायला…..

एकमत ऑनलाईन

व्हर्जिनिया : अमेरिकेच्या व्हर्जिनियामध्ये एक दुकान लुटण्यासाठी दोन चोर एका खास अंदाज पोहोचले. या दोन्ही चोरांचा फोटो लुइसा पोलीस विभागाने शनिवारी फेसबूकवर शेअर केला आहे. यानंतर हा फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेही एका काळ्या रंगाच्या टोयोटा गाडीतून एक दुकान लुटण्यासाठी पोहोचले होते. जेव्हा ते गाडीनत बाहेर आले, तेव्हा त्यांनी तोंडाला मास्क लावण्या ऐवजी डोक्यात टरबूज घातले होते.

आपण या व्हायरल फोटोमध्ये बघू शकता, की या दोन्ही चोरांनी हॅलोविनप्रमाणे, टरबुजावर डोळे तयार केले आणि ते घालून ते दुकान लुटण्यासाटी गेले. एवढेच नाही, तर या दोघांनी चोरीपूर्वी एका दुसऱ्या दुकानावर सोबतच फोटोही काढला होता. या चोरांचे हे फोटो फेसबूकवर शेअर झाल्यानंतर काही तासांतच जबरदस्त व्हायरल झाले.

1, 000 हून अधिक लोकांनी या फोटोवर केल्या कामेन्ट 

हे व्हायरल फोटो आतापर्यंत 5, 000 हून अधिक वेळा शेअर झाले आहेत. तर 1, 000 हून अधिक लोकांनी या फोटोवर कामेन्ट केल्या आहेत. यातील एका युझरची कमेन्ट तर सर्वात जास्त व्हायरल होत आहे. ही कमेंट म्हणजे, या दोन्ही चोरांचा चोरीपूर्वी काही तास आगोदर काढलेला एक फोटो. या फोटोत ते ज्या कपड्यांवर आहेत, तेच कपडे त्यांनी चोरी करतानाही घातलेले आहेत. एवढेच नाही, तर त्यांनी डोक्यावर टरबुजही घातलेले आहे. यामुळेच हे चोर अगदी सहजपणे पोलिसांच्या हाती लागले.

व्हिडिओ  सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल

अशा अफलातून पद्धतीने चोरी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर यापूर्वीही. अशा अनेक घटना घडल्या आहेत आणि अनेक घटना घडतही असतात. महाराष्ट्रातही गेल्या वर्षी एका चोराने सीसीटिव्हीपासून बचाव करण्यासाठी तोंडासमोर घमिले धरून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेचा व्हिडिओदेखील सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या