हिमायतनगर : तालुक्यातील मौजे पळसपुर येथे मध्यरात्री पंधरा ते वीस जणांच्या चोरांच्या टोळीने गावात शिरून दोन किराणा दुकान फोडून तेथील रोख रक्कम घेऊन येथील एका नागरीकाला दगडफेक करून गंभीर जखमी करून ते चोरटे पसार झाले असल्याचे उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले.
या बाबत सविस्तर वृत्त असे की मौजे पळसपुर येथे मध्यरात्री चोरांनी गावात शिरून मध्यरात्री ठिक १२.३० वाजता दिगांबर वानखेडे यांच्या घराच्या दरवाज्याची कडी लावून त्यांचे किराणा दुकान फोडून त्यांच्या दुकानात असलेले पन्नास हजाराची रोख रक्कम पळवली.
त्यानंतर रात्री १.२० वाजता माधवराव सुर्यवंशी यांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न करत असताना चोरांनी एका मागे एक दगडफेक केली त्या दगडफेकीत माधवराव सुर्यवंशी हडसनकर हे गंभीर जखमी झाले. ते तेथून निघाल्यानंतर अवधुत देवसरकर यांच्या किराणा दुकानाजवळ येऊन पुन्हा त्यांनी दगडफेक केली.
व त्यांच्या किराणा दुकानातून १५ हजार रोख रखमेसह त्यांच्याकडे ग्राहकांचे शिवायला टाकलेले कपडे व विक्रीसाठी ठेवलेले २५ हजाराचे कपडे घेऊन पळाले व अवधुत देवसरकर यांच्या घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. दोन तास चोरांची टोळी गावात प्रवेश करून ठिकठिकाणी चोरी करत असल्याने गावातील नागरीक जागे झाल्याने चोरांनी येथून पळ काढला.
हा सर्व प्रकार ज्यांच्या दुकाणात चोरी झाली ते दुकानदार आपल्या डोळ्यांनी टकमक बघत होती. परंतु चोरांच्या हातात धार धार हत्यार आणि दगडफेक करत असल्यामुळे ते काही करू शकले नाही. त्याच बरोबर गावातील अनेक नागरीकांनी चोरांना बघीतले पण चोर दगडफेक करत असल्याने कोणीही सुरूवातीला घराच्या बाहेर येणाचा प्रयत्न केला नाही