18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeआंतरराष्ट्रीयस्विस बँकेने दिली तिसरी यादी

स्विस बँकेने दिली तिसरी यादी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काळ्या पैशाविरोधातील लढाईत केंद्र सरकारला मोठे यश मिळाले आहे. स्वित्झर्लंडसोबत केलेल्या करारानुसार स्वित्झर्लंड सरकारने भारतीयांच्या स्विस बँकेतील खात्याची तिसरी यादी भारत सरकारकडे सुपूर्द केली आहे. स्वित्झर्लंडने सांगितले की, त्यांनी ८६ देशांसोबत ३१ लाख आर्थिक खात्यांची माहिती शेअर केली आहे. तर ९६ देशांसोबत ३३ लाख आर्थिक खात्यांची माहिती शेअर केली आहे.

भारत त्या ९६ देशांमध्ये सामिल आहे ज्यांच्यासोबत स्वित्झर्लंडच्या संघीय कर प्रशासनाने या वर्षी त्यांच्या बँकेमध्ये असलेल्या खात्यांची माहिती दिली आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०२० स्वित्झर्लंड सरकारने ८६ देशांसोबत ३१ लाख आर्थिक खात्यांची माहिती शेअर केली होती. तर त्यापूर्वी सप्टेंबर २०१९ रोजी स्वित्झर्लंडने भारतासोबत ७५ देशांसोबत अशी माहिती शेअर केली होती.

यावर्षी १० नव्या देशांना दिली माहिती
संघीय कर प्रशासनाने या संदर्भात सोमवारी सांगितले की, या वर्षी १० आणखी देशांशी माहितीचे आदान-प्रदान केले आहे. यामध्ये अँटिगुआ आणि बारबुडा, अजरबैजान, डॉमिनिका, घाना, लेबनान, मककाऊ, पाकिस्तान, कतार, समोआ आणि वाऊतू यांची समावेश आहे. दरम्यान, सर्व ९६ देशांची नावे आणि पुढच्या वितरणाचा खुलासा केलेला नाही. अधिका-यांच्या माहितीनुसार, भारताला सलग तिस-या वर्षी माहिती मिळाली आहे. भारतीय अधिका-यांसोबत शेअर केलेल्या बँकेच्या विवरणात स्विस आर्थिक संस्थांमध्ये मोठ्या संख्येने व्यक्ती आणि कंपन्यांच्या खात्यांचा समावेश आहे.

२६ देशांना दिली नाही माहिती
२६ देशांनी स्वित्झर्लंडसोबत माहिती शेअर केली. पण त्याबदल्यात स्वित्झर्लंडने आपल्यावतीनं त्यांना माहिती दिली नाही. असं मानलं जात आहे की, डेटा सुरक्षेच्यामुळं १४ देशांना स्वित्झर्लंडने माहिती शेअर करण्यास नकार दिला आहे. तर १२ देशांनी जाणून-बुझून माहिती प्राप्त न झाल्यावर सहमती दर्शवली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या