22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeही लढाई हिंदुत्वासाठी; सदा सरवणकर

ही लढाई हिंदुत्वासाठी; सदा सरवणकर

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिंदे गटातील सदा सरवणकरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येण्यापूर्वी मनसे शिंदे गटासोबत जाणार अशी चर्चा होती. दरम्यान, सरवणकरांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने या चर्चेला उधाण आले आहे.

माध्यमांशी बोलताना सरवणकरांनी राज ठाकरेंच्या भेटीचे कारण स्पष्ट केले आहे. सेनेला टक्कर देण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत अशी चर्चा रंगली आहे. मात्र, यामध्ये कोणतेही तथ्य नाही. एक हिंदुत्वाची लढाई आहे.

अखंड हिंदू एकत्र करणे आणि त्यांच्यासाठी झगडणे हाच त्यामागचा उद्देश आहे.
उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील झालेले दादरचे आमदार सदा सरवणकर यांनी ‘शिवतीर्थ’वर राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, माध्यमांशी बोलताना त्यांनी सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

मनसे आणि भाजपाची वाढती जवळीक पाहता आगामी पालिका निवडणुकीत नव्या समीकरणांची नांदी पाहायला मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. मनसेच्या स्थापनेनंतर दादर परिसरात वर्चस्व निर्माण करत राज ठाकरे यांनी शिवसेनेला जबर धक्का दिला होता.

पण हे यश कायम राखण्यात मनसेला अपयश आले. शिवसेनेने सदा सरवणकर यांचे तिकिट कापून आदेश बांदेकर यांना दिल्यानेही सरवणकर नाराज होते. पण २०१९ च्या निवडणुकीत संधी मिळून आमदार झालेले सदा सरवणकर शिंदे यांच्या बंडानंतर थेट त्यांच्या गटात सामील झाले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या