23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रया कपातीचे आश्चर्य वाटतेय ; इंधन दर कपातीच्या निर्णयानंतर काँग्रेसचा सवाल

या कपातीचे आश्चर्य वाटतेय ; इंधन दर कपातीच्या निर्णयानंतर काँग्रेसचा सवाल

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्य सरकारने केलेल्या इंधन दर कपातीवर काँग्रेसने प्रश्न उपस्थित करताना भाजपला त्यांच्या जुन्या मागणीची आठवण करून दिली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना पेट्रोल डिझेलवरील व्हॅटमध्ये ५० टक्के
कपातीची मागणी भाजपने केली होती. या मागणीचे काय झाले, असा प्रश्न काँग्रेसने केला आहे.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपला जुन्या मागणीची आठवण करून दिली आहे. शिंदे फडणवीस सरकारने पेट्रोल व डिझेल दरांमध्ये अनुक्रमे पाच रुपये आणि तीन रुपये एवढीच कपात केली याचे आश्चर्य वाटत असल्याचे म्हटले. मविआ सरकारकडे एकूण व्हॅटवर ५० टक्के कपात करा म्हणजे एकूण पेट्रोलवरील ३२.५५ पैकी पैकी १६.२८ रुपये आणि डिझेल वरील २२.३७ रुपयांपैकी ११.१९ रुपये कमी करा अशी भाजपाची मागणी होती, त्याचे काय झाले असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला.
सावंत यांनी ट्वीट करताना भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ ट्वीट केला आहे.

सचिन सावंत यांनी राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनादेखील त्यांच्या जुन्या आरोपांची आठवण करून दिली आहे. केंद्रीय कराएवढे राज्याचे कर असावेत व राज्याचा कर केंद्रापेक्षा १० रुपयांनी जास्त असल्याने मविआमुळे महागाई वाढत आहे असा आरोप फडणवीस करत होते. अजूनही केंद्रापेक्षा जास्त महाराष्ट्राचा कर आहेच. त्याचे काय असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला. राज्यात कर कपात केल्यानंतरही गुजरात आणि कर्नाटकमधील दर कमी असल्याची आठवणही सावंत यांनी करून दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या