22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रसरकारचा जनतेचे विकास कामांपासून लक्ष विचलीत करण्याचा हा प्रयत्न

सरकारचा जनतेचे विकास कामांपासून लक्ष विचलीत करण्याचा हा प्रयत्न

एकमत ऑनलाईन

पुणे : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याकूब मेमन याच्या कबरीचे सुशोभीकरण केल्यावरून पेटलेल्या वादावर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. अशा समाजकंटकांना कुणीच महत्त्व देऊ नये असे म्हणत या सरकारचा जनतेचे विकास कामांपासून लक्ष विचलीत करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.

या प्रकरणावर संताप व्यक्त करत अजित पवारांनी सरकारवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात मला माहिती नाही, आता मी माहिती घेतो पण अशा समाजकंटक आणि देशद्रोह्यांबद्दल बोलण्याचा प्रयत्न करू नये, असे पवार म्हणाले. त्याचबरोबर ‘असे काहीतरी मुद्दे काढायचे आणि जनतेचे मन विचलीत करायचे.

यांच्याकडे बेरोजगारी, महागाई अशा मुद्यांवर बोलण्यासाठी उत्तरं नाहीत. सध्या राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. रोज आत्महत्या होत आहेत. या प्रश्नाकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाही. या प्रश्नावरून डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न यांच्याकडून केला जात आहे, असा आरोप अजित पवारांनी केला आहे.

दरम्यान, ही घटना कुणाच्याही सरकारच्या काळात व्हायला पाहिजे नव्हती. अशा घटना होऊ नयेत असे ते म्हणाले. त्याचबरोबर शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याचा मान हा दरवर्षी शिवसेनेचा असतो पण शिंदे गट आणि शिवसेनेत चाललेल्या मेळाव्याच्या वादावरील निर्णय न्यायालय देईल, असे मत पवारांनी व्यक्त केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या