22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्र...हा तर महाराष्ट्राचा अपमान

…हा तर महाराष्ट्राचा अपमान

एकमत ऑनलाईन

नाथ प्रतिष्ठानच्या कार्यक्रमांवर टीका करणा-यांना धनंजय मुंडे यांचे उत्तर
बीड : राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानने परळीत आयोजित केलेल्या लावणीच्या कार्यक्रमावर टीका करण्यात आली आहे. याला धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांवरून विविध सामाजिक कार्यात आणि संकट काळात सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीला धावून जाणा-या नाथ प्रतिष्ठान या संस्थेला बदनाम करण्यापेक्षा, तुमचा राग माझ्यावर असेल तर व्यक्तिगत माझ्यावर टीका करा, असं धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

हममे नाम है, इसिलीये हमे बदनाम कर रहे हो?
असा शेर सुनावत धनंजय मुंडे यांनी म्हटलं की, विविध लोककला, लावणी, सांस्कृतिक कार्यक्रम ही महाराष्ट्राच्या मातीची परंपरा आहे. अशा पारंपरिक कार्यक्रमांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

अजय-अतुलसह अमृताने जिंकली परळीकरांची मने
नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून मुंडे यांनी अशा विविध क्षेत्रातील कलाकारांना संधी उपलब्ध करून देत असतात म्हणून त्यांचे आभार मानले पाहिजेत असे सुप्रसिद्ध गायक-संगीतकार अजय-अतुल जोडीतील अतुल गोगावले यांनी कौतुक केले. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान मार्फत परळी येथे सुरू असलेल्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवात अजय-अतुल यांच्या संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर अभिनेत्री अमृता खानविलकर यांनीही आपली नृत्य कला यावेळी सादर केली.

लावणी महाराष्ट्राची ..
लावणीला कमी लेखू नका असे आवाहन तिने ट्रोल करणा-या लोकांना केले आहे. परळीच्या नाथ प्रतिष्ठान आयोजित केलेल्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये नुकताच अमृता खानविलकरचा लावणी परफॉर्मन्स ठेवण्यात आला होता. मात्र, हा परफॉर्मन्स सादर केल्यानंतर सदर गणेशोत्सव मंडळावर टीका होऊ लागली.

त्यानंतर अमृताने पुढे येऊन म्हणाली की, अनेक कलाकार इथे येऊन आपली कला सादर करतात. लहान असोत की मोठ्या असोत पण महाराष्ट्राच्या कलेची उपासना समजल्या जाणा-या लावणी सारख्या कार्यक्रमांवरून कोणी महिला कलाकारांना लक्ष करत असेल, वृत्त वाहिन्याकिंवा आणखी कोणी लावणी सारख्या लोककलेला अश्लीलतेचे नाव देत असेल तर ते पाप ठरेल, महाराष्ट्राच्या लोककलेची जगभर ओळख म्हणून लावणी प्रसिद्ध आहे. अंगभर कपडे घालून, शृंगार रस सादर करणारी लावणी, त्यात काही व् ूज मिळवण्यासाठीकिंवा केवळ ट्रोल करण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन गालबोट लावू नये असे अमृता खानविलकरनं म्हटलं.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या