22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्र...हा तर भाजपाचा थिल्लरपणा

…हा तर भाजपाचा थिल्लरपणा

एकमत ऑनलाईन

 बेस्ट’वरील भाजपाच्या बॅनरबाजीवरून मनिषा कायंदेंचा हल्लाबोल

मुंबई : मुंबईची लाईफलाईन समजली जाणा-या बेस्ट बसेसवर भाजपाने केलेल्या जाहिरातबाजीवर सध्या विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. या जाहिरातींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र झळकत आहेत. या बॅनरबाजीतून शिवसेनेला डिवचण्याच्या भाजपा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान गणेशोत्सवानिमित्त भाजपाकडून मुंबईतील बेस्ट बसेसवर बॅनरबाजी करण्यात आली आहे. ‘‘आपले सरकार आले, हिंदू सणांवरचे विघ्न टळले’ अशा आशयाची जाहिरातबाजी सध्या बसेसवर पाहायला मिळतेय. या जाहिरातीवर शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी जोरदार टीका केली आहे. हा केवळ भाजपाचा थिल्लरपणा असल्याचा हल्लाबोल कायंदे यांनी केला आहे. ही जाहिरातबाजी करताना भाजपाने परवानगी घेतली होती का? असा सवालही कायंदे यांनी केला आहे.

कोरोना जागतिक महामारीच्या काळात भाजपाने सातत्याने निर्बंधाविषयी आरडाओरडा केला. करोनामुळे संपूर्ण जग थांबले होते. वैज्ञानिक आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यावेळी उद्धव ठाकरेंनी नागरिकांवर निर्बंध लावले होते. त्यानंतर हळूहळू हे निर्बंध शिथील देखील करण्यात आले होते’’ असे कायंदे यांनी म्हटले आहे. करोना महामारीच्या दोन वर्षांच्या काळात तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारकडून लादण्यात आलेल्या निर्बंधांचा पाठपुरावा करतानाच कायंदे यांनी भाजपावर शाब्दिक हल्ला चढवला आहे.

कोरोना निर्बंध उठवण्यासाठी भाजपाकडून सातत्याने आंदोलनं करण्यात आली. मंदिरं उघडण्यासाठीही भाजपाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात आले होते. या आंदोलनांमुळेच राज्यात करोनाचा जास्त प्रसार झाल्याचा आरोप कायंदे यांनी केला आहे. या काळात भाजपाने दाखवलेल्या बेजबाबदारपणाचा निषेध करत असल्याचं कायंदे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या