27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रयाला म्हणतात पक्षनिष्ठा; प्रा. हरी नरके

याला म्हणतात पक्षनिष्ठा; प्रा. हरी नरके

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात सध्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. शिवेसना नेते एकनाथ शिंदे बडंखोर आमदारांसोबत गुवाहाटी येथे आहेत. शिंदे गटाजवळ या घडीला ५० आमदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, राज्यातील सुरु असलेल्या या राजकीय घडामोडींवर आता इतिहास अभ्यासक प्रा. हरी नरके यांनी ताशेर ओढले आहेत. अप्रत्यक्षरित्या त्यांनी सेनेतील गुवाहाटी येथे असलेल्या बंडखोर आमदारांना आणि भाजपला टोले लगावले आहेत.

प्रा. हरी नरके यांनी यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं आहे. ते म्हणतात, डोंगारफेमस तत्वनिष्ठ आमदारांची स्वामिनिष्ठ कहाणी सादर केली जात होती. हे आमदार काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना असा पक्षांतराचा प्रवास करत सध्या महासत्तेच्या गुवाहाटी कोंडवाड्यात आलेले आहेत. याला म्हणतात पक्षनिष्ठा! ही त्यांची आमदारकीची दुसरी टर्म आहे.

या आमदारांची पहिली टर्म पूर्ण झाली आहे. ज्यांना वर्षाकाठी लाखो रुपये पेन्शन मिळते आणि आता दुस-या टर्मला दरमहा लाखो रुपये वेतन व भत्ते मिळत आहे, ते आमदार म्हणतात की, माझी बायको पाटलाची सून असून तिला नवं लुगडं ते घेऊ शकत नाहीत. किती ही गरिबी!, असे म्हणत त्यांनी आमदार शहाजी पाटलांना टोला लगावला आहे.

यानंतर त्यांनी ट्वीटमध्ये आमदारांना मिळणा-या निधीवर त्यांनी भाष्य केलं आहे. आमदारांना वर्षाला काही कोटी रुपये आमदार फंड मिळतो. तो सार्वजनिक कामांवर खर्च करताना त्यातील किमान ३५% मलिदा ज्या आमरांना व्यक्तिगत भेट म्हणून मिळतो, ते आमदार रड्याची भाषा करत आहेत.

राजकारणासाठी घरादाराची राखरांगोळी केली असून ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे ते बोलत आहेत. जे आपल्या निम्म्या वयाच्या विरोधीपक्ष नेत्यांना ‘आपला बाप’ मानतात आणि आसाम बापू त्यांच्याकडे मुलासारखे बघतात, केवढा हा त्याग!, असंही ते म्हणाले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या