चंदीगड: पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी चीनला थेट इशारा देत म्हटले आहे की, बीजिंगच्या धमकीला दिल्ली अजिबात घाबरणार नाही. दरम्यान, अमरिंदर सिंह यांनी दोन्ही देशातील सीमा वाद हा चर्चेद्वारे सोडविला पाहिजे या गोष्टीवर जोर दिला. भारत युद्धाचे समर्थन करत नाही मात्र कुठल्याही परिस्थितीत आम्ही चीनची दादागिरी सहन करणार नाही. आता हे १९६२ साल नसून जग २०२० या वर्षात आहे. आता बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. यापुढे बोलताना अमरिंदर सिंह म्हणाले की, जर चीनने कुठल्याही प्रकारची आगळीक बंद नाही केली तर याचे परिणाम चीनला भोगावे लागतील.
फेसबुक लाइव्ह सत्राच्या दरम्यान, कोलकात्याच्या एका नागरिकाच्या प्रश्नाचे उत्तर देतांना कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले की, भारतीय सैन्य दल चीनला प्रत्यूत्तर देण्यास तयार आहे. त्यामुळे चीनने कुठल्याही भ्रमात राहू नये.
आता चीन याबाबत अंत्यत आक्रमक धोरण अवलंबवत आहे
कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी चीनला आवाहन केला आहे की, चीनने आजूबाजूच्या देशांबाबत असलेली वर्तणूक सुधारावी आणि भारताशी चर्चेद्वारे सीमा वादाचा प्रश्न सोडवावा. परंतू चीनी सैन्याच्या वर्तनुकीत कुठलाही फरक दिसला नाही तर आमच्यासमोर (भारतासमोर) युद्धाशिवाय कुठलाही पर्याय असणार नाही. सिंह यांनी पुढे म्हटले की, चीन सीमाभागातील भारताचे कुठलेही विकास किंवा निर्माण कार्य थांबवू शकत नाही. कारण जेव्हा अक्साई चीन भागात चीनने रस्ते बांधकाम सुरु केले तेंव्हा भारताने कुठलाही आक्षेप घेतला नाही. जो मुलत: भारताचा भाग आहे. मात्र आता चीन याबाबत अंत्यत आक्रमक धोरण अवलंबवत आहे.
Read More ‘मन की बात’; ट्रॅक्टरद्वारे गावात सॅनिटायझरची फवारणी करणाऱ्या नाशिकच्या शेतकऱ्याचे कौतुक
पाकिस्तानलादेखील कडक इशारा
कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पाकिस्तानलादेखील कडक इशारा दिला आहे. सध्या पाकिस्तानकडून पंजाब आणि इतर राज्यात ड्रोन आणि इतर शस्रांस्राच्या माध्यामातून सीमेपलीकडून दहशतवादी, हत्यारे आणि मादक पदार्थांची मोठ्या प्रमाणावर तस्करीचा प्रयत्न होत आहे. या व्यतिरिक्त अमरिंदर सिंह यांनी माहिती दिली की, आम्ही एक अशी त्रिस्तिरीय सुरक्षा संरचना तयार केली आहे. ज्यात बीएसएफ (सीमा सुरक्षा दल), पंजाब पोलीस आणि भारतीय सेनेचा सामावेश आहे. या तिन्ही दलांकडून संयुक्तरित्या २४ तासांकरिता डोळ्यात तेल घालून सीमेचे संरक्षण करीत आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी पंजाब पोलीसांकडून ३२ वेगवेगळ्या प्रकारच्या आतंकवाद्याच्या मॉड्यूलचा भांडाफोड करण्यात आला होता आणि २०० पेक्षा अधिक हत्यारे जप्त करण्यात आली होती. पंजाब पोलिसांनी सिमावर्ती भागात मोठ्या प्रमाणावर गणवेशधारी आणि बिगर गणवेशधारी पोलीस कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नियुक्ती केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पतियाळाच्या राजघराण्यात जन्म झालेले कॅप्टन अमरिंदर सिंह हे राष्ट्रीय सुरक्षा अकादमीचे (एनडीए) चे विद्यार्थीही होते. भारतीय सैन्यदलात कॅप्टन या पदावर राहून त्यांनी सैन्य दलात सेवाही बजावली होती.