18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeमहाराष्ट्र'ही तर सरसंघचालकांची शिवसेना'.....; शिंदे गट होतोय सोशल मीडियावर ट्रोल

‘ही तर सरसंघचालकांची शिवसेना’…..; शिंदे गट होतोय सोशल मीडियावर ट्रोल

एकमत ऑनलाईन

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर नव्या नावासाठी उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाला अंधेरी पोटनिवडणुकीसाठी नवी नावे आणि चिन्हे दिल्यानंतर लगेचच नव्या राजकीय लढाईला सुरुवात झाली.

एकनाथ शिंदे गटाला यापुढे बाळासाहेबांची शिवसेना गट म्हणून ओळखले जाईल. दरम्यान, ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची नसून ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिवंगत नेते बाळासाहेब देवरस यांची असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक दिवंगत बाळासाहेब देवरस यांचे नाव मिळाले आहे, भाजपने डाव साधला आहे, असे या मेसेजमध्ये म्हटले आहे.

निवडणूक आयोगाने शिंदे गटाने सुचविलेल्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या नावाला मान्यता दिली आहे. आपल्या नावात बाळासाहेबांचा उल्लेख असल्यामुळे शिंदे गटातील आमदारांसह समर्थकांनाही आनंद झाला.

निवडणूक आयोगाने नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर ‘आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार’ असे ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्यावरून सोशल मीडियावर अनेकांनी शिंदे गटावर टीका केली आहे. ‘हे कुठले बाळासाहेब?’ बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब सामंत की बाळासाहेब कदम? असा खिल्ली उडवणारा प्रश्नही सोशल मीडिया युजरने एकनाथ शिंदे यांना विचारला. त्यामुळे आगामी काळात ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या नावावरून आणखी राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या