28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeमहाराष्ट्रएकनाथ शिंदे यांच्या राजकीय अस्ताची ही सुरुवात ; राष्ट्रवादी काँग्रेस

एकनाथ शिंदे यांच्या राजकीय अस्ताची ही सुरुवात ; राष्ट्रवादी काँग्रेस

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिंदेंचा खांदा वापरून भाजपाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा फडशा पाडण्याचे काम चालवले आहे. आता धनुष्यबाण चिन्ह गोठवले गेले आहे. भाजपाचे काम फत्ते झाले आहे. आता हस्तक शिंदेंचा भाजपाला काय उपयोग? एकनाथ शिंदे यांच्या राजकीय अस्ताची ही सुरुवात आहे? असे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी केले आहे.

शिवसेनेचे ‘धनुष्य-बाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा हंगामी आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री उशिरा जारी केला. आयोगाचा हा निर्णय शिवसेनेसाठी धक्कादायक असून त्याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाण्याची शक्यता आहे.

तसेच न्यायालयाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. कालपासून विविध नेत्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी देखील आज औरंगाबादेत प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी ट्वीटद्वारे भाजपावर थेट आरोप केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या