25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रहे तर शिवसेना, राष्ट्रवादीचे कारस्थान; व्हायरल क्लिपवर भुमरेंची प्रतिक्रिया

हे तर शिवसेना, राष्ट्रवादीचे कारस्थान; व्हायरल क्लिपवर भुमरेंची प्रतिक्रिया

एकमत ऑनलाईन

पैठण : आज पैठणमध्ये मुख्यमंर्त्यांची सभा रेकॉर्डब्रेक होणार आहे. सध्या जी ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. ती शिवसेना, राष्ट्रवादीसारख्या विरोधकांनी तयार केली आहे.
हा तालुका शिंदे साहेबांच्या कायम पाठीशी राहिलेला आहे आणि राहणार आहे. इथे कुणालाही पैसे देण्याची गरज नाही. कारण प्रत्येक गावागावातून कार्यकर्ते स्वखर्चाने सभेला येत आहेत. ही सभा रेकॉर्डब्रेक होणार आहे. असं संदीपान भुमरे यांनी कथित ऑडिओ क्लिपसंबंधी स्पष्टीकरण दिले आहे.

दरम्यान पैठण येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज जाहीर सभा होणार असून या सभेसाठी पैसे देऊन गर्दी जमवली जाणार असल्याची चर्चा होत आहे.

तसेच या प्रकरणाची एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली असून मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर शिवसेनेच्या नेत्यांकडून आरोप केले जात आहेत. त्यानंतर भुमरे यांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपावर स्पष्टीकरण दिलं आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या