सिंगल चार्ज मध्ये ३० दिवसांचा स्टँड बाय बॅटरी लाईफ
मुंबई : आज बाजारात ५ हजार एमएएचची बॅटरी असलेले अनेक स्मार्टफोन उपलब्ध आहेत. मात्र बॅटरी जितकी अधिक क्षमतेची तितके अधिक चांगले असे गणित असल्याने चीनी स्मार्टफोन मेकर ऑउकीटेल कंपनीने १० हजार एमएएच बॅटरी असलेला स्मार्टफोन ऑउकीटेल डब्ल्यू पी ६ नावाने बाजारात आणला आहे. या फोनचे ग्लोबल लाँचिंग मार्च मध्ये झाले आहे.
हा फोन आयपी ६९ के सर्टिफिकेशन सह उपलब्ध आहे. या फोनला १ हजार एमएएचची एक पोर्टेबल बॅटरी पण दिली गेली आहे. सिंगल चार्ज मध्ये ३० दिवसांचा स्टँड बाय बॅटरी लाईफ असून १८ डब्ल्यू फास्ट चार्जर वर तीन तासात बॅटरी पूर्ण चार्ज होते.
Read More पी. सिवा शंकर सोलापूर महापालिकेचे नवे आयुक्त
फोनसाठी ४८ एमपीचा मेन कॅमेरा, ५ एमपीचा डेप्थ सेन्सर, २ एमपीचा सेन्सर असा ट्रिपल कॅमेरा सेट आहे तर सेल्फीसाठी १६ एमपी कॅमेरा दिला गेला आहे. ६.३ इंची फुल एचडी डिस्प्ले, प्रोटेक्शन कोर्निंग गोरीला ग्लास सह आहे. ६ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज दिले गेले आहे. फोनची किंमत २३९.९९ डॉलर्स म्हणजे साधारण १८ हजार रुपये आहे.
जगातील हा पहिलाच १० हजार एमएएच बॅटरी आणि ४८ एमपी कॅमेरा असलेला, सहज न तुटणारा, वॉटर आणि डस्टप्रूफ फोन असल्याचा कंपनीचा दावा आहे.