18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeमहाराष्ट्रबाळासाहेबांचे विचार आमच्या मनात; मुख्यमंत्र्यांकडून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

बाळासाहेबांचे विचार आमच्या मनात; मुख्यमंत्र्यांकडून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

एकमत ऑनलाईन

मुंबई : सत्तासंघर्षानंतर राज्यात शिवसेना कोणाची, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर सुप्रीम कोर्टात सुनावणीदेखील सुरू आहे. अशातच शिवसेना आमचीच, असे ठाम मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडले आहे. दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज १०वा स्मृतिदिन आहे.

यानिमित्त ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचे विचार आमच्या मनात, अशा शब्दांत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे.

साहेब आपले विचार आणि स्मृती सदैव आमच्या मनात… वंदनीय हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..अशा आशयाचे ट्विट करत मुख्यमंत्री शिंदे यांनी अभिवादन केले आहे.

एकनाथ शिंदेंसह त्यांच्या गटाने अनेकवेळा हा शिंदे गट नाही तर बाळासाहेबांची शिवसेना आहे, असे ठामपणे सांगितले आहे. राज्यात परिवर्तनाची गरज आहे. आम्ही परिवर्तन केले. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना मानणारे शिवसैनिक आहोत. आम्ही आनंद दिघेंच्या मार्गावर चालणारे कार्यकर्ते आहोत, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी अनेकवेळा जनतेला संबोधित करताना सांगितले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या