22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्रही साधी पण आपुलकी व प्रेमाने ओथंबलेली भेट.... ; सुप्रिया सुळेंचा व्हीडीओ...

ही साधी पण आपुलकी व प्रेमाने ओथंबलेली भेट…. ; सुप्रिया सुळेंचा व्हीडीओ व्हायरल

एकमत ऑनलाईन

बारामती : हे नाते आपुलकीचे आहे. भोर तालुक्यातील आपटी या गावचे जानबा पारठे हे आदरणीय पवार साहेबांचे जुने सहकारी आहेत. मी जेव्हा त्या मार्गावरून जाते तेव्हा हे काका माझी वाट पाहत थांबलेले असतात. ते माझी विचारपूस करतात आणि अतिशय प्रेमाने अळूची वडी व भाकरीचा डबा देतात… अशा आशयाची पोस्ट राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे सोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टिव्ह असतात. त्यांच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरून त्या नवनवीन व्हीडीओ, फोटो आणि पोस्ट शेअर करत असतात. सध्या त्यांचा असाच एक व्हीडीओ व्हायरल होतोय जो त्यांनी शेअर केला आहे.

त्या पुढे लिहितात, ही साधी पण आपुलकी व प्रेमाने ओथंबलेली भेट…. आवर्जून नमूद करायची बाब म्हणजे ते साहेबांना देखील असाच डबा देतात. अगदी मध्यंतरी ते दिल्लीला जाऊन आले तेव्हा त्यांनी साहेबांसाठी खास हा डबा बांधून आणला होता. ही प्रेमळ भेट तर आहेच पण त्याहीपेक्षा मोठा तो आशीर्वाद देखील आहे. या प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे. धन्यवाद…

या व्हीडीओमध्ये त्यांच्याप्रति गावगाड्यात किती प्रेम आहे, हे दिसून येते. सध्या हा व्हीडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरला आहे. सदर व्हीडीओमध्ये एक काका सुप्रियाताईंना अळूच्या वडीचा आणि भाकरीचा डबा देताना दिसताहेत. हा डबा पाहून सुप्रियाताई भावूक होतात आणि त्यांचे आभार मानतात

. पुढे त्या या व्हीडीओमध्ये बोलताना सांगतात की, हे काका नेहमी त्यांची वाट पाहत थांबलेले असतात. ते विचारपूस करतात आणि अतिशय प्रेमाने अळूची वडी व भाकरीचा डबा देतात. या काकांचे नाव जानबा पारठे असून ते भोर तालुक्यातील आपटी या गावचे रहिवासी आहेत. शरद पवार यांचे ते जुने सहकारी आहेत.
….

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या