23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयहा दौरा राजकीय नाही, मी दर्शन घेण्यासाठी आलो

हा दौरा राजकीय नाही, मी दर्शन घेण्यासाठी आलो

एकमत ऑनलाईन

लखनौ : शिवसेना नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे लखनौ विमानतळावर जंगी स्वागत झाले. यावेळी त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात फुलांच्या पायघड्यांनी स्वागत करण्यात आले. विमानतळाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना हा दौरा राजकीय नाही. हा श्रद्धेचा विषय असून मी दर्शन घेण्यासाठी आलो आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य म्हणाले की, देवळात गेल्यावर मागणे मागण्यापेक्षा मी आशीर्वाद घेत असतो. जे काही दिले आहे, सेवा करण्याची संधी दिली आहे. त्यासाठी धन्यवाद बोलत असतो. ही रामराज्याची भूमी राजकारणाची नाही. ही भूमी भारताच्या आस्थेची आहे. आमचे राजकारण समाजकार्यासाठी असते. हातून चांगले कार्य व्हावे, अशी प्रार्थना करत असतो.

आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसैनिकदेखील मोठ्या संख्येने अयोध्येत दाखल झाले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊतही आदित्य यांच्या दौ-यासाठी अयोध्येत दाखल झाले आहेत. आदित्य ठाकरेंचा अयोध्येमध्ये दिवसभराचा कार्यक्रम आहे.

लखनौ विमानतळाकडून ते अयोध्येसाठी रवाना झाले. दुपारी आदित्य ठाकरे इस्कॉन मंदिराला भेट देणार आहेत. यानंतर ते पत्रकार परिषद घेतील. यानंतर ते संध्याकाळी लक्ष्मण किलाला भेट देणार असून शरयू नदीच्या किना-यावर आरती करणार आहेत. यानंतर त्यांचा परतीचा प्रवास सुरू होईल.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या