21.2 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रमहसूल खात्यामुळे थोरात-विखे-पाटील यांच्यात जुंपली

महसूल खात्यामुळे थोरात-विखे-पाटील यांच्यात जुंपली

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्याच्या मंत्रीमंडळाचा नुकताच विस्तार झाला आहोत. या मंत्रीमंडळातील मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आलं. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर विश्वास दाखवत महसूलसारखे वजनदार खाते त्यांना दिले. दरम्यान, महसूल मंत्री खात मिळताच विखे पाटील यांनी मागील सरकारच्या काळातील महसूल विभागात झालेल्या कामांची चौकशी करण्याची गरज असल्याचं म्हटले.

नव्या वादाला तोंड फुटले. बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे-पाटील हे अहमदनगर जिल्ह्यात पारंपरिक राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील यांना महसूल मंत्रिपद देण्यात आलं.

महसूल खात्याची सूत्रे हाती घेताच विखे-पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांची चौकशी करण्याचे संकेत दिले. मविआ सरकारच्या कार्यकाळात महसूल खातं हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे होतं.
सुजय विखे-पाटीलांवरही पलटवार

राधाकृष्ण विखे-पाटलांना महसूल मंत्रीपद मिळाल्यानंतर सुजय विखे-पाटील यांनी बाळासाहेबांना डिवचले होते. दोन महसूल मंर्त्यांच्या कामातील फरक दाखवून देऊ, अशा आशायाचे वक्तव्य त्यांनी केले होते. बाळासाहेब थोरात यांनी या वक्तव्याची फार दखल घेणे टाळले. सुजय विखे-पाटील यांच्या वक्तव्यावर उत्तर देऊन त्यांना महाराष्ट्रात प्रसिद्धी द्यावी असं मला वाटत नाही. जनतेने माझा कारभार पाहिला, आता त्यांचा कारभार जनता पाहील, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या