22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्रथोरातांनी स्वत:च्या अस्तित्वाची चिंता करावी : चंद्रकांत पाटील

थोरातांनी स्वत:च्या अस्तित्वाची चिंता करावी : चंद्रकांत पाटील

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज ठाकरे यांचे अस्तित्व धोक्यात येईल असे बाळासाहेब थोरात म्हणत आहेत. त्यांनी आधी स्वत:च्या अस्तित्वाची चिंता करावी, राज ठाकरे यांची चिंता नसावी असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. भाजपचा अजेंडा जरी बाळासाहेब थोरात यांनी राबवला तरी आम्ही स्वागत करू असे देखील पाटील म्हणाले. राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळाली नसती तरी सभा झाली असती.

सध्या मनसेसोबत युती करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे पाटील यांनी सांगितले.
कोल्हापूर-पुणे महामार्गावर अनेक कॅमेरे लावले आहेत. थोडा वेळ वाढला की लगेच दंड केला जातो.

आताचा दंड देखील भरला आहे. रस्ते चांगले झाले, मग नागरिकांनी गाड्या चांगल्या घेतल्या. आता त्याला स्पीड लिमिट लावले जाते आहे. अशा दंडामुळे घरे दारे विकायची वेळ येईल, असे पाटील म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या