27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रअहमदनगरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा धोका, शिर्डीत रेड अलर्ट

अहमदनगरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा धोका, शिर्डीत रेड अलर्ट

एकमत ऑनलाईन

शिर्डी : शिर्डीत पंजाबचा मोस्ट वॉन्टेड अतिरेकी सापडल्यावर शिर्डीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभुमीवर अहमदनगरमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव शिर्डी पोलिसांनी हे महत्वाचे पाऊल उचलले आहे. दहशतवादी कारवाईच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील पोलिस सतर्क झाले आहेत. शिर्डीत रेड अलर्ट देण्यात आला आहे.

शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांची संख्या जास्त प्रमाणात आहे. या भाविकांवरही आता पोलीस नजर ठेवुन आहेत. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी भाविक राहण्यासाठी हॉटेल, रिसॉर्ट बुक करतात. पण यावेळी त्यांची संपुर्ण तपासणी केली जाणार आहे. ओळखपत्र न पाहता राहण्यासाठी रुम दिल्यास त्या हॉटेल मालकावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीसांकडुन सांगण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी १४४ कलम लागू केले. शिर्डीतील सुरक्षितेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. प्रशासनाच्या वतीने काही ठोस पावले तातडीने उचलली गेली आहेत. याबद्दलची माहिती एसपी मनोज पाटील यांनी दिली आहे.

पाटील पुढे म्हणाले की, जे व्यावसायिक नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर १८८ कलमानूसार कारवाई केली जाईल. तसेच सिम कार्ड विक्रेत्यांनी देखील योग्य कागदपत्रांशिवाय सिम कार्ड वितरीत केले गेले तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी देखील परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवून काही संशायस्पद आढळल्यास अथवा वाटल्यास पोलिस प्रशासनाला कळवावे असे आवाहन पोलिस दलाने केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या