काबुल : तालिबान संघटनेचा नेता अहमद यासिर याने ट्विटच्या माध्यमातून पाकिस्तानला धमकी दिली आहे. तसेच १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाचा फोटो शेअर करीत भारतीय लष्कराचे कौतुकही केले आहे.
पाकिस्तान-अफगाणिस्तानमधील संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आला असून, तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान संघटनेने अफगाणिस्तानला देशात घुसून हल्ल्याची धमकी दिली. त्यानंतर तालिबानने धमकी दिली आहे.