23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रमोटरसायकल अपघातात तिघे गतप्राण; एक गंभीर जखमी

मोटरसायकल अपघातात तिघे गतप्राण; एक गंभीर जखमी

एकमत ऑनलाईन

सांगली : सांगलीतील एका अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कोसारी गावात ही घटना घडली आहे. एकाच दिवशी गावातील तीन तरुणांचा मृत्यू झाल्यानं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

सांगलीतील जत तालुक्यातील चार मित्र एकाच दुचाकीवरुन जात होते. रात्री उशीरा ही घटना घडली. त्यावेळी बिरनाळ ओढ्याजवळ दुचाकीवरील ताबा सुटल्यानं अपघात घडला. जत तालुक्यातील बिरनाळ ओढ्याजवळ ही दुर्घटना घडली. कोसारी येथील चार मित्र एका दुचाकीवरुन जतहून त्यांच्या गावी कोसारीकडे निघाले होते.

बिरनाळ ओढ्याजवळ असलेल्या वळणावर दुचाकीवरील चालकाचा ताबा सुटला. या अपघातात दुचाकी चालवत असलेला अजित भोसले (वय २२) हा जागीच ठार झाला. तर गंभीर जखमी झालेले मोहीत तोरवे (वय २१) आणि राजेंद्र भाले (वय २२) यांचा उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला.

तर या तरुणांचा चौथा मित्र संग्राम तोरवे (वय १६ हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, बिरनाळ नजीक असणा-या धोकादायक वळणावर ओढा पात्रानजीक मोटरसायकलवरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाला. एकाच मोटरसायकलवर चौघेजण प्रवास करत होते. यातील अजित भोसले हा जागीच ठार झाला.

स्थानिकांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अपघाताचं गांभीर्य ओळखत मोहित तोरवे, राजेंद्र भाले, संग्राम तोरवे या तिघांना बिरनाळ रुग्णालयात उपचारासाठी तातडीनं दाखल केले होते.

मात्र गंभीर जखम झाल्यामुळे मोहित तोरवे, राजेंद्र भाले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकाच दिवशी तीन युवकांचा अपघातात मृत्यू झाल्यानं कोसारी गावावर शोककळा पसरली आहे. घटनास्थळी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या