24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रपिकअपच्या अपघातात ४ वर्षीय बालकासह तिघे मृत्युमुखी

पिकअपच्या अपघातात ४ वर्षीय बालकासह तिघे मृत्युमुखी

एकमत ऑनलाईन

जुन्नर : दुर्गावाडी (ता. जुन्नर) येथून देवीचे दर्शन घेऊन परतणा-या भाविकांच्या पिकअप गाडीचा गणेशखिंडीत अपघात झाला. मंगळवारी (दि. १०) रात्री दहाच्या सुमारास येथील धोकादायक वळणावर कोटमवाडीच्या भाविकांची जीप दरीत कोसळली. या अपघातात तिघे मृत्युमुखी पडले. यामध्ये ४ वर्षीय बालकाचा समावेश आहे. विघ्नेश विलास सांगडे (वय ४), शांताराम दादाभाऊ भारती (वय ४५) व बारकाबाई महादू भोईर (वय ५८) (रा. सर्वजण सितेवाडी-कोटमवाडी, ता. जुन्नर) अशी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची नावे आहेत.

दरीतील झाडाला अडकली पिकअप जीप
याबाबतचे वृत्त असे की, दुर्गावाडी (ता. जुन्नर) येथून देवीचे दर्शन घेऊन भाविक पिकअप वाहनाने परत येत होते. यावेळी हे वाहन गणेशखिंड (ता. जुन्नर) येथील कडे तोडून दरीत कोसळले. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे पिकअप वाहन दरीत कोसळल्यानंतर ते दरीतील झाडांना अडकले. त्यामुळे आणखी जीवित हानी टळली असे या अपघातातून वाचलेल्यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या