Tuesday, September 26, 2023

ईसापूर धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तीन युवकांचा बुडून मृत्यू

जिल्हाभरात हळहळ : नागरिकांनी घटनास्थळी धाव; दोनजण बचावले

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील मोरगव्हाण गावाजवळ ईसापूर धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या हिंगोली शहरातील तीन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी 2.30 वाजता घडली. या घटनेतून दोन जण बचावले असून या घटनेमुळे हिंगोली शहरासह जिल्हाभरात हळहळ व्यक्त होत आहे.

 घटनेनंतर दोन्ही तरुणांनी आरडाओरड : हिंगोली शहरातील 5 तरुण कळमनुरी तालुक्यातील मोरगव्हाणच्या गावाजवळ ईसापुर धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रात पोहण्यासाठी रविवारी दुपारी 2.30 वाजता मित्रासोबत गेले होते. धरणात पोहत असताना धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने योगेश बालाजी गडप्पा ( वय 20, रा. बियाणीनगर, हिंगोली), शिवम सुधीर चोंढेकर ( वय 21, रा. भट्ट कॉलनी हिंगोली) आणि रोहित अनिल चिंत्तेवार ( वय 23, रा. पोस्ट ऑफीस रोड, हिंगोली) या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर निखिल नागोराव बोलके आणि श्रीकांत संजीव चोंढेकर हे दोनजण बचावले. या घटनेनंतर दोन्ही तरुणांनी आरडाओरड केल्याने मोरगव्हाण परिसरातील शेतकरी व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

तीन तरुणांचे मृतदेह एका तासानंतर बाहेर काढण्यात आले : याबाबतची माहिती कळमनुरी पोलिसांना कळविण्यात आल्याने पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे, पीएसआय ज्ञानोबा मुलगीर, पवार, वाढे, शाम गुहाडे, नलवार, गणेश सुर्यवंशी यांच्या पथकासह नायब तहसीलदार श्रीराम पाचपुते, मंडळ अधिकारी यु.आर. डाखोरे घटनास्थळी दाखल झाले. योगेश गडाप्पा, शिवम चोंढेकर, रोहित चिंचेवार या तीन तरुणांचे मृतदेह एका तासानंतर बाहेर काढण्यात आले. त्यांचे मृतदेह कळमनुरी येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. मृत्यू झालेली मुले जिल्हा प्रशासनातील कर्मचाऱ्यांची मुले असून या घटनेमुळे हिंगोली शहरासह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

Read More  धक्कादायक : वडिलांची हत्या करण्यासाठी आई, भावाने केली मदत

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या