18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeक्रीडाटायगर अभी जिंदा है ...

टायगर अभी जिंदा है …

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रंिसग धोनी याने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. त्यानंतरच्या आयपीएलमध्ये धोनीच्या सीएसके ने खराब कामगिरी केली. पण सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये धोनी आणि चेन्नईच्या संघाने धडाकेबाज पुनरागमन केले. प्ले ऑफच्या पहिल्या सामन्यात कर्णधार धोनीने शेवटच्या षटकात तब्बल ३ चौकार आणि १ षटकार खेचत संघाला चित्तथरारक विजय मिळवून दिला. धोनीने आपल्या टीकाकारांना दिल्लीविरूद्धच्या सामन्यात दमदार प्रत्युत्तर दिलं.

त्यानंतर धोनीवर स्तुतीचा वर्षाव झाला.
ओम फिनिशाय नम: ! टायगर अभी जिंदा है …. चेन्नईने धडाकेबाज विजय मिळवला. ऋतुराजने अप्रतिम खेळी केली. उथप्पाच्या अनुभवाचाही संघाला फायदा झाला. आणि धोनीने पुन्हा एकदा दाखवून दिलं की दडपणाच्या स्थितीत थंड डोक्याने केलेला खेळ किती महत्त्वाचा असतो. चेन्नईला मिळालेला विजय दमदारच आहे. गेल्या हंगामात अतिशय खराब कामगिरी केल्यानंतर चेन्नईने केलेले पुनरागमन वाखाणण्याजोगे आहे, अशा शब्दात विरेंद्र सेहवागने धोनीच्या खेळीची आणि चेन्नईच्या विजयाची स्तुती केली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या