27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeराष्ट्रीय११ जून पासून तिरुपती मंदिर भाविकांसाठी खुले

११ जून पासून तिरुपती मंदिर भाविकांसाठी खुले

एकमत ऑनलाईन

लाखो लोकांचे श्रद्धास्थान तिरुपती येथील वेंकटेश्वर बालाजीचे मंदिर ११ जून पासून भाविकांना दर्शनासाठी खुले केले जात आहे. करोना मुळे देशभर लागू झालेल्या लॉक डाऊनमध्ये २० मार्च नंतर मंदिर भाविकांसाठी बंद केले गेले होते. मंदिर खुले होणार असले तरी दररोज ६ हजार भाविकांनाच दर्शनाची संधी मिळणार आहे.

मंदिर प्रबंधन समितीचे अध्यक्ष वाय बी सुब्बा रेड्डी, कार्यकारी अध्यक्ष अनिलकुमार सिंघल यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेतली. त्यात मंदिरात कुणाला प्रवेश मिळेल याची माहिती दिली गेली. मंदिर दररोज १३ तास खुले राहणार असून तासाला ५०० भाविक दर्शन घेऊ शकणार आहेत. १० वर्षाखालील मुले आणि वृद्ध यांना सध्या तरी प्रवेश देण्यात येणार नाही.

दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची प्रवास हिस्ट्री तपासली जाणार असून कोविड १९ तपासणीही होणार आहे. ताप असेल तर संबंधिताला क्वारंटाइन केले जाणार आहे. ३०० रुपये दर्शन तिकीट घेणार्यांना ८ जून पासून तिकीट ऑनलाईन मिळू शकेल तर बाकी ३ हजार मुफ्त दर्शन घेणार्यांना त्याची नावे अगोदर रजिस्टर करावी लागणार आहेत.

Read More  तिरुपती बालाजी मंदिरालाही कोरोनाचा फटका ;1300 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढले

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या