24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeविशेष'कोरोना'ला दूर ठेवण्यासाठी 'हे' 6 पदार्थ आवश्य सेवन करा, जाणून घ्या महत्व

‘कोरोना’ला दूर ठेवण्यासाठी ‘हे’ 6 पदार्थ आवश्य सेवन करा, जाणून घ्या महत्व

एकमत ऑनलाईन

मुंबई, – कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे आपण मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग, आदी काळजी घेत आहोत, त्याचप्रमाणे आहाराची देखील काळजी घेतली पाहिजे. निरोगी राहायचे असेल तर आहारात योग्य त्या पदार्थांचा समावेश केलाच पाहिजे. जेणेकरून तुमची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत राहील. यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, व या पदार्थांचे महत्त्व, याविषयी माहिती घेवूयात.

हे पदार्थ आवश्य खा

1 अंडे
यातून व्हिटामीन ई, प्रोटिन्स मिळत असल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. इम्यून सिस्टिम चांगली होते.

2 पालक
याच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते. हृदयाशी संबंधित आजारांशी लढण्यास मदत होते. टीबीसारखा आजार दूर ठेवणे शक्य होऊ शकते.

3 लसूण
उच्च रक्तदाब असल्यास रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्यास लाभदायक ठरते. यामुळे रक्ताभिसरण चांगले होते. हृदयरोगांचा धोका कमी होतो. कोलेस्ट्रॉलची समस्या नियंत्रणात राहते.

4 ढोबळी मिरची
यातील व्हिटॉमिन सी मुळे रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. फ्लू, इंफेक्शनपासून संरक्षण होते. हानीकारक बॅक्टेरीयांपासून बचाव होतो. अल्सर रोखण्यासाठी उपयुक्त ही उपयुक्त आहे. पचन सुधारते, अपचनाचा त्रास कमी होतो.

5 ब्रोकोली
यातील भरपूर फायबर्समुळे पचनसंस्था सुरळीत होते. पोटाचे विकार कमी होतात.

6 चणे
याच्या नियमित सेवनाने हिमोग्लोबिन वाढते. शरीराच्या इतर समस्या दूर होतात. त्वचा, दातांच्या समस्यांवरही लाभदायक आहेत. रक्त वाढीसाठी उपयुक्त आहेत. दातांच्या समस्येवरही गुणकारी आहेत.

Read more  रविवार दिलासादायक ठरला; एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या