मुंबई : येस बँक, डीएचएफएल कर्ज फसवणुकीप्रकरणी बांधकाम व्यावसायिक संजय छाब्रिया यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. डीएचएफएलकडून ६७८ कोटी बेहिशोबी कर्ज घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
केंद्रीय तपास यंत्रणेने संजय छाब्रिया यांना अटक केली होती. येस बँक-डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी ही अटक करण्यात आली. संजय छाब्रिया हे रेडियस ग्रुपचे प्रवर्तक आहेत. १५ फेब्रुवारी रोजी सीबीआयने संजय छाब्रिया आणि त्यांच्या कंपनीच्या १५ ठिकाणांवर छापे टाकले होते, ज्यामध्ये या प्रकरणाशी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली होती.
संजय छाब्रिया तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा मार्च २०२० पासून या प्रकरणाचा तपास करत होती.