25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रकमी बॉल्समध्ये जास्त रन्स काढायचेत; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला

कमी बॉल्समध्ये जास्त रन्स काढायचेत; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला

एकमत ऑनलाईन

मुंबई : उद्धव ठाकरे सरकारच्या काळात मुंबई मेट्रो ३ प्रकल्पावरून जोरदार राजकारण रंगले होते. या मेट्रोसाठी कारशेड आरेमध्ये करावे की कांजूरमार्गमध्ये यावरून मोठा वाद झाल्यानंतर ठाकरे सरकारने कारशेड आरेमधून हलवून कांजूरमार्गला नेले. तिथेही स्थगिती आल्यामुळे हे काम थांबले होते.

अखेर शिंदे सरकारच्या काळात त्यासंदर्भातल्या सर्व परवानग्या देण्यात आल्या. अखेर आज मेट्रो ३ च्या पहिल्या मेट्रोची यशस्वी चाचणी घेण्यात आली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सरकारसह आदित्य ठाकरेंवर खोचक टीका केली आहे.

पर्यावरणाचा -हास सुरू असल्याचा कांगावा करून मेट्रो ३ च्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. पण मेट्रोचा प्रकल्प पर्यावरणाचा समतोल राखणारा आहे. पर्यावरण संतुलनासाठी फायद्यासाठी मेट्रोचा प्रकल्प योग्य आहे, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

मेट्रो ३च्या पहिल्या ट्रेनच्या टेस्टिंग दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. अनेक विघ्नं आली. त्या विघ्नांवर मात करत मेट्रो सुरू केली आहे. आता यापुढे कोणतीही विघ्नं येणार नाहीत. फडणवीसांनी महामार्गासाठी इच्छाशक्ती दाखवली. फडणवीसांमुळे या कामाला गती मिळाली. त्यांच्या कामात अनेक प्रकल्प मार्गी लागले, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमने उधळली.

तसेच, विरोधकांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. सगळ्या प्रकल्पाला न्याय देण्याचा प्रयत्न करू. आम्हाला कमी वेळात जास्त काम करायचे आहे. कमी बॉल्समध्ये जास्त रन्स काढायच्या आहेत. आम्हाला लोकोपयोगी प्रकल्प आणायचे आहेत. अनेक विघ्नं आली. त्या विघ्नावर मात करत मेट्रो सुरू केली आहे. आता यापुढे कोणतीही विघ्नं येणार नाहीत. राजकारणातील प्रदूषण दूर झाले आहे, अशा शब्दांत विरोधकांना मुख्यमंत्री शिंदे यांनी डिवचले.

आता विकास थांबणार नाही
संघर्षानंतर शिंदे-फडणवीस सरकार आले आहे. आता विकास थांबणार नाही. मेट्रो तीनचा पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी फायदाच होणार आहे, असा दावा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. मुंबई मेट्रो तीनची चाचणी आज घेण्यात आली, या कार्यक्रमप्रसंगी एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी मेट्रोचे फायदे सांगत असतानाच त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही टोले लगावले.

‘आपण सहकार्य केले पाहिजे’
प्रकल्पाच्या तीनही बाजूने झाडे आहेत. लोकांच्या मताचा विचार करून न्यायालयानेही हिरवा झेंडा दाखवला. आव्हानात्मक कामे असतात, त्याला आपण सहकार्य केले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. जिथे कनेक्टिव्हिटी नाही, तिथे कनेक्टिव्हिटी देणारा हा प्रकल्प असल्याचे ते म्हणाले. पब्लिक ट्रान्सपोर्ट सक्षम असेल तर कोणी स्वत:च्या गाड्या बाहेर काढणार नाहीत, असे ते म्हणाले. अधिकारी अश्विनी भिडे यांचेही यावेळी त्यांनी कौतुक केले.

‘राजकारण करणार नाही’
कमी बॉलमध्ये जास्त रन काढायच्या आहेत. पूर्ण बॅटिंग नाही. अडीच वर्षच आहेत. त्यामुळे अधिक काम करायचे आहे. फडणवीसांना पाच वर्षांचा अनुभव आहे. आणि आता तर मीदेखील त्यांच्या सोबत आहे. आधी एकच भारी पडत होता. आता एक से भले दो. आम्ही कुठेही राजकारण करणार नाही. मात्र सर्वसामान्यांचे हे सरकार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे. आधीच हे सरकार यायला हवे होते, असे लोकांना वाटते, असा दावा त्यांनी केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या